03 June 2020

News Flash

रोमी भाटिया की दीपिका? ’83’ मधील हा फोटो पाहून पडेल प्रश्न

'83' मध्ये दीपिका, पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे

लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे त्याच्यासोबत दीपिका पदुकोणदेखील स्क्रीन शेअर करणार असून तिच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आतापर्यंत या चित्रपटातील अनेक भूमिकांवरील पडदा दूर सारण्यात आला. त्यानंतर आता बहुचर्चित ठरलेला दीपिकाचा फर्स्ट लूकदेखील समोर आला आहे.

’83’ या चित्रपटात दीपिका, कपिल देव यांच्या पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे. प्रदर्शित झालेल्या फोटोमध्ये दीपिका हुबेहूब रोमी भाटिया यांच्यासारखी दिसत आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी दीपिका योग्य असल्याचं दिसून येत आहे.


देशाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या क्षणावर आधारित चित्रपटाचा एक भाग होता आलं ही माझ्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे. पतीला त्याच्या यशापर्यंत पोहोचवण्याच्या मार्गामध्ये एका पत्नीची भूमिका किती महत्त्वाची असते हे मी स्वत: जवळून पाहिलं आहे. त्यामुळे ज्या महिला त्यांच्या पतीच्या यशासाठी स्वत:चं सर्वस्व अर्पण करतात त्या साऱ्या महिलांना 83 हा चित्रपट समर्पित आहे, असं दीपिका म्हणाली.

वाचा : ‘स्वदेश’मधील ‘कावेरी अम्मा’ काळाच्या पडद्याआड

‘83 ’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क,चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 9:55 am

Web Title: deepika padukone romi bhatia first look biopic 83 ssj 93
Next Stories
1 ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाचा ‘मराठा लाईट इन्फण्ट्री’मध्ये संग्रह
2 ‘अमेरिका गॉट टॅलेंट’मध्ये वसई-भाईंदरचे नृत्यपथक अव्वल
3 करोना वायरसचा ‘जेम्स बॉण्ड’लाही फटका
Just Now!
X