News Flash

…म्हणून ‘डीआयडी’फेम धर्मेशवर आली रस्त्यावर डान्स करुन पैसे कमवायची वेळ

त्याच्यावर ही वेळ का आली?

झी वाहिनीवरील ‘डान्स इंडिया डान्स’ या शोमधील धर्मेश सर साऱ्यांच्याच लक्षात असेल. उत्तम नृत्यशैलीच्या जोरावर धर्मेशने डान्स करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनावर अधिराज्य केलं. त्यामुळेच त्याची लोकप्रियता तुफान आहे. सध्या धर्मेश छोट्या पडद्यावरील ‘खतरों के खिलाडी’च्या १० पर्वात पाहायला मिळत आहे.  विशेष म्हणजे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला हा कलाकार पैसे मिळविण्यासाठी चक्क रस्त्यावर डान्स करताना दिसत आहे. सध्या त्याचा रस्त्यावर डान्स करतानाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून त्याच्यावर ही वेळ का आली असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

‘खतरों के खिलाडी’ हा शो त्यातील भन्नाट टास्क आणि स्टंटसाठी ओळखला जातो. यंदाच्या पर्वामध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरसोबतच धर्मेशदेखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच शोमधील टास्कचा भाग म्हणून धर्मेशला सध्या रस्त्यावर डान्स करुन पैसे कमवावे लागत आहेत. ‘अँडव्हांटेज वीक’ या एपिसोडअंतर्गंत धर्मेश आणि बलराज स्याल यांना एक टास्क देण्यात आला आहे. या टास्कमध्ये त्यांना बुल्गारियात रस्त्यावर डान्स करुन पैसे कमवायचे आहे. विशेष म्हणजे या टास्कमध्ये कमावलेले पैसे त्यांना पुढील टास्कमध्ये वापरायचे आहेत.

“डान्स करणं हा धर्मेशसाठी टास्क वाटत नाही. उलट त्याला नाचायला आवडतं. त्यामुळे तो या टास्कचा मनमुराद आनंद लुटत आहे. ज्यावेळी तो डान्स करत होता. तेव्हा प्रत्येक स्पर्धक थक्क होऊन पाहत होता”, असं सेटवरील कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

दरम्यान, छोट्या पडद्यावरील गाजलेल्या  रिअॅलिटी शो पैकी खतरों के खिलाडी  हा एक लोकप्रिय शो आहे. या शोमध्ये अॅक्शन आणि थरारक स्टंट्सचा भरणा असल्यामुळे तो दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे. या शोचं सूत्रसंचालन रोहित शेट्टी करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 2:26 pm

Web Title: dharmesh yelande street dance at khatron ke khiladi hosted by rohit shetty ssj 93
Next Stories
1 “तुम्ही पापं केली म्हणून आला करोना”; अभिनेत्रीने केलं वादग्रस्त विधान
2 ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत लगीनघाई, नववधूच्या रुपातील दीपाचा लूक लक्ष वेधणारा
3 Coronavirus : करोनाची लागण झाली तर लोकं मरणारच; असंवेदनशील वक्तव्यामुळे अभिनेत्री ट्रोल
Just Now!
X