28 February 2021

News Flash

‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधून नायरा घेणार एक्झिट?

खुद्द शिवांगीने एका मुलाखतीमध्ये यावर वक्तव्य केले आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘ये रिश्ता क्या कहलाता है.’ या मालिकेतील नायरा आणि कार्तिकने अनेकांची मने जिंकली आहेत. पण आता मालिकेत एक नवे ट्विस्ट येणार आहे. मालिकेतील नायराचा अपघातामध्ये मृत्यू होणार आहे. मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर करत याबाबत माहिती देण्यात आली आहे. आता नायराची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवांगी जोशीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकताच शिवांगीने ईटाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतून एक्झिट घेण्याबाबत वक्तव्य केले आहे. ‘मालिकेतील नायरा या पात्राचा मृत्यू नक्की होणार आहे. पण मी मालिकेतून एक्झिट घेणार हे चुकीचे आहे’ असे शिवांगी म्हणाली.

पुढे ती म्हणाली, ‘सोशल मीडियावर सध्या अनेक अफवा पसरवल्या जात आहे. या अफवांचा माझ्यावर परिणाम होत नाही. मालिकेत काय घडणार आहे हे येत्या १० दिवसांमध्ये सर्वांना कळेल. मी मालिकेच्या चाहत्यांना विनंती करेन की त्यांनी गेल्या २० वर्षांपासून जसे आमच्यावर प्रेम केले ते कायम करावे.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 4:49 pm

Web Title: did shivangi joshi taking exit in yeh rishta kya kehlata hai avb 95
Next Stories
1 किचन वर्सेस लिव्हींग रूम; नेहाने शेअर केली घरातील रिअ‍ॅलिटी
2 ‘श्रीकांत मिशन के पिछे, और विलेन..’ ; ‘फॅमेली मॅन 2’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
3 नेहा कक्करची जादू कायम, आता मिळाला डायमंड पुरस्कार
Just Now!
X