News Flash

“घरातही शर्ट घालूनच राहायचं”, शाहरुख खानची मुलगा आर्यनला ताकीद!

एका मुलाखतीत शाहरुखने हा खुलासा केला आहे.

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खानचे लाखो चाहते आहेत. शाहरुख नेहमीच समानतेवर जोर देताना दिसतो. शाहरुखच्या घरात त्याच्या मुलाला मुलीपेक्षा जास्त किंवा कोणता विशेष अधिकार नाही, यावर त्याने उघडपणे सांगितले आहे. शाहरुख त्याच्या मोठ्या मुलाला म्हणजेच आर्यनला घरात शर्टलेस फिरण्याची परवाणगी देत नाही. याबद्दल शाहरुखने एका मुलाखतीत सांगितले होते.

शाहरुखने २०१७ मध्ये ‘फेमिना’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत शाहरुखने हा खुलासा केला. शाहरुख घरी असताना आर्यनला नेहमी शर्ट घालायला सांगतो. त्याच्या मते, एखाद्या पुरुषाला घरात असलेल्या आई, बहिण किंवा मैत्रिणींसमोर शर्टलेस राहण्याचा अधिकार नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

यावर शाहरुख म्हणाला, जर आपल्या आई, मुलगी, बहिण किंवा मैत्रिणीला कपड्यांशिवाय पाहून आपण अस्वस्थ होत असू. तर, त्या ही तुम्हाला पाहून अस्वस्थ होणार नाही अशी अपेक्षा तुम्ही करु शकतं नाही.” त्याच्या मते याचा संबंध स्तानाशी नाही. एखादी मुलगी घरात जे करु शकतं नाही ते त्याच्या मुलांनी घरी करु नये अशी त्याची इच्छा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aryan Khan (@___aryan___)

तर, शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी यांच १९९१ मध्ये लग्न झालं आहे. त्यांना ३ मुलं असून आर्यन, सुहाना आणि अबराम असे त्यांच्या मुलांची नाव आहेत.

आणखी वाचा : वाढत्या वयामुळे होणाऱ्या बदलांबद्दल प्रियांका म्हणते….

दरम्यान, शाहरुख लवकरच ‘पठाण’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत. या चित्रपटात पहिल्यांदाच शाहरुख आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 4:27 pm

Web Title: did you know shah rukh khan does not allow son aryan khan to be shirtless at home dcp 98
Next Stories
1 सुगंधाने केली लता मंगेशकर यांची मिमिक्री, सांगितलं भोसले कनेक्शन
2 इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमधील वादावरून कंगना आणि इरफान पठाणमध्ये वादाची ठिणगी
3 Video: ‘बजरंगी भाईजान’मधील मुन्नीचा सलमानच्या ‘सीटी मार’ गाण्यावर डान्स
Just Now!
X