24 February 2021

News Flash

वेब सीरिजच्या निमित्ताने प्रसिद्ध दिग्दर्शक समीर पाटील पुन्हा एकदा अभिनयाकडे

'तरतीतो' या वेब सीरिजमध्ये ते भूमिका साकारत आहेत.

समीर पाटील

‘तरतीतो’ या वेब सीरिजच्या निमित्ताने प्रसिद्ध दिग्दर्शक समीर पाटील पुन्हा एकदा अभिनयाकडे वळले आहेत. अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या व्हायरस मराठीच्या ‘तरतीतो’ या वेब सीरिजमध्ये ते भूमिका साकारत आहेत.

बाबा जेव्हा आई होऊन आपल्या मुलांचे संगोपन करून पूर्ण घराची जबाबदारी उचलतात तेव्हा नेमके काय घडते हे या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळत आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केले आहे.

‘तरतीतो’ ही ठाण्यात वास्तव्यास असणाऱ्या तरे कुटुंबाची गोष्ट आहे. वडील मनोहर तरे, मुलगी क्षिती आणि मुलगा तोष हे ठाण्यात घोडबंदर रोडला राहत असून, पत्नी मात्र कामानिमित्त सांगलीला राहत असते. त्यामुळे घरासोबत आपल्या मुलांची जबाबदारी ही मनोहर तरेंवर येऊन पडते. तेच मुलांचे बाबा आणि आई सुद्धा होतात. अगदी स्वयंपाकापासून धुणी-भांडी करण्यापर्यंतची कामं ते करतात. खूप मोठ्या काळानंतर समीर पाटील यांना अभिनय करताना पाहणे ही प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.

व्हायरस मराठीच्या गाजलेल्या ‘तरतीतो’ या शो चे ३ भाग युट्यूबवर प्रदर्शित झाले असून ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून चौथा भाग शुक्रवारी येत आहे. हलके फुलके पण तितकेच गोड संवाद आणि विनोदाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या शोचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

मनोहर तरेंची भूमिका समीर पाटील साकारत असून, मुलीच्या भूमिकेत अंकिता देसाई आणि मुलाच्या भूमिकेत सृजन देशपांडे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 1:19 pm

Web Title: director samir patil returning to acting for web series tartito ssv 92
Next Stories
1 लतिका आणि अभिमन्यूची जुळणार रेशीमगाठ!
2 Viral Video: टॉम क्रुजही झाला भारतनिर्भर… ‘मेड इन इंडिया’ बाईकवर करतोय स्टंटबाजी
3 फराज खानच्या मदतीसाठी सलमान आला धावून, भरले हॉस्पिटलचे बिल
Just Now!
X