News Flash

‘सदोष टेस्ट किटमुळे करोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती’- चिरंजिवींचा खुलासा

ट्विट करत केला खुलासा..

काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजिवी यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली होती. आता चिरंजिवी यांची करोना चाचणी निगेटीव्ह आली असल्याचे त्यांनी पोस्ट शेअर करत म्हटले आहे. तसेच त्यांनी पोस्टमध्ये सदोष RTPCR टेस्ट किटमुळे आधीची करोना चाचणी पॉझिटीव्ह असल्याचे सांगितले आहे.

करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यापासून चिरंजिवी हे होम क्वारंटाइनमध्ये होते. त्यांना करोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नव्हती. आता चिरंजिवी यांनी ट्विट करत सदोष RTPCR टेस्ट किटमुळे आधीची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती आणि आताची करोना चाचणी निगेटीव्ह आल्याचे सांगितले आहे.

‘डॉक्टरांनी माझी तिन वेळा करोना चाचणी केली आणि ती चाचणी निगेटीव्ह आली आहे. सदोष RTPCR टेस्ट किटमुळे आधीची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती’ असे चिरंजिवी यांनी ट्विट करत म्हटले आहे.

चिरंजिवी हे लवकरच ‘आचार्य’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करणार होते. पण त्यापूर्वी त्यांनी करोना चाचणी करुन घेतली आणि ती पॉझिटीव्ह आली होती. आता त्यांची करोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. ‘आचार्य’ या चित्रपटात चिरंजिवी हे दोन भूमिका साकारणार आहेत. चाहत्यांमध्ये या चित्रपटाची घोषणा करताच उत्सुकता पाहायला मिळाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 6:37 pm

Web Title: earlier result was postive due to a faulty rt pcr kit chiranjivi avb 95
Next Stories
1 ‘जब तक है जान…’, रहमान यांनी सांगितल्या आठवण
2 ‘मलाही २१ वर्षांची मुलगी आहे त्यामुळे…’, विनयभंगाच्या आरोपांवर विजय राजचे वक्तव्य
3 सोनाली कुलकर्णी दाखवणार आपल्या नृत्याचा जलवा
Just Now!
X