News Flash

एकता कपूरने सुशांतच्या आठवणीमध्ये लाँच केला ‘पवित्र रिश्ता फंड’

य़ा फंडद्वारे लोकांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने नैराश्यामध्ये आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे. सुशांतच्या निधनाला जवळपास एक महिना होऊन गेला आहे. आता एकता कपूरने झी५ चे सीइओ तरुण कटियाला यांच्यासोबत मिळून सुशांतची आठवण म्हणून ‘पवित्र रिश्ता फंड’ सुरु केला आहे. लोकांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘पवित्र रिश्ता’ फंड सुरू करण्यात आला आहे.

याबाबत एकताने बॉलिवूडलाईफला मुलाखत दिली. ‘गेल्या १० वर्षात खूप काही बदले आहे. आज आपल्यावर अनेक प्रकारचे प्रेशर असते. सध्या करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक लोकांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे. त्यामुळे पवित्र रिश्ता या फंडाद्वारे आम्ही मानसिक आजारांशी लढणाऱ्या लोकांना मदत करणार आहोत’ असे तिने म्हटले आहे.

सुशांतने एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेत काम केले होते. या मालिकेत त्याने मानव हे पात्र साकारले होते. त्याच्या या भूमिकेने अनेकांची मने जिंकली होती. तसेच त्याच्यासोबत या मालिकेत अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत होती. आता एकता कपूरने सुशांतच्या आठवणीमध्ये त्याच्या या लोकप्रिय मालिकेच्या नावाने फंड सुरु केला आहे. लोकांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी हे फंड सुरु करण्यात आला आहे.

आता सुशांत सिंह राजपूतचा अखेरचा चित्रपट ‘दिल बेचारा’ २४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. मुकेश छाब्रा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच अभिनेत्री संजना सांघी ही सुशांतसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. संजना या चित्रपटाच्या निमित्ताने कलाविश्वात पदार्पण करणार आहे. तसेच अभिनेता सैफ अली खानदेखील या चित्रपटात पाहूण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे जुलै २०१८मध्ये चित्रीकरण सुरु झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. तसेच हा चित्रपट जॉन ग्रीक यांच्या ‘द फॉल्ट इन आवर स्टार्स’ या पुस्तकावर आधारित असल्याचे म्हटले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 9:06 am

Web Title: ekta kapoor starts pavitra rishta fund in memory of sushant singh rajput avb 95
Next Stories
1 मुलीचा बारावीचा निकाल पाहून शरद पोंक्षे भावूक, म्हणाले “माझ्यावर कर्करोगाचे उपचार सुरू असताना तिने..”
2 Video : ‘चल थोडा डान्स करे’; संजनाने शेअर केल्या सुशांतसोबतच्या कटूगोड आठवणी
3 बिग बींनी मानले चाहत्यांचे आभार; रात्री ट्विट करत म्हणाले…
Just Now!
X