22 January 2021

News Flash

..आणि ‘फन्ने खान’ मधील गाण्यात झाला असा बदल!

'फन्ने खान'मधील हे गाणं चित्रित करताना त्यात एक विशिष्ट बदल करण्यात आला असून हा बदल ऐश्वर्या राय-बच्चनमुळे करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

बॉलिवूडमधील ऐश्वर्य अर्थात ऐश्वर्या राय हिचा आगामी ‘फन्ने खान’ या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीच चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जवळपास पूर्ण झाले असून नुकतंच या चित्रपटातील एक गाणं चित्रित करण्यात आलं. ‘फन्ने खान’मधील हे गाणं चित्रित करताना त्यात एक विशिष्ट बदल करण्यात आला असून हा बदल ऐश्वर्या राय-बच्चनमुळे करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

अतुल मांजरेकर दिग्दर्शित ‘फन्ने खान’ या चित्रपटामध्ये ऐश्वर्या राय-बच्चन, अनिल कपूर आणि राजकुमार राव हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये ऐश्वर्या आयटम सॉंग करताना दिसून येणार आहे. या गाण्याच्या माध्यमातून ऐश्वर्या पुन्हा एकदा तिच्या अदाकारीतून प्रेक्षकांना घायळ करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

‘फन्ने खान’चं चित्रीकरण जवळपास पूर्ण झालं असून काही दिवसापूर्वीच मुंबईतील फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये चित्रपटातील एका गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं. मात्र या गाण्याचे बोल ऐश्वर्याला न पटल्यामुळे गाण्यात  बदल करण्यात आला आहे. गाण्याचं चित्रीकरण सुरु असताना यातील काही बोल ऐश्वर्याला खटकले होते. त्यामुळे तिने गाण्याचे बोल बदलण्याची विनंती चित्रपट निर्मात्यांना केली होती. विशेष म्हणजे दिग्दर्शक -निर्मात्यांनी ऐश्वर्याच्या विनंतीच मान ठेवत केवळ गाण्याचे बोलच नाही तर संपूर्ण गाणंच बदलल्याचे पिंकव्हिला या संकेतस्थळाच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, या चित्रपटाचे चित्रीकरण जवळपास पूर्ण झाले असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ऐश्वर्या राय-बच्चन पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सक्रिय झाली असून ती ख-या अर्थाने करिअरकडे वळल्याचं दिसून येत आहे. ‘फन्ने खान’ या चित्रपटामध्ये देखील ती अभिनयाच्या जोरावर पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकून घेईल असं सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 11:58 am

Web Title: fanney khan song changed because aishwarya rai was not happy with it
Next Stories
1 ..म्हणून करण जोहरवर मंगेशकर कुटुंबीय झाले नाराज!
2 चौदा वर्षांनंतर पुन्हा तोच निखळ अनुभव!
3 जगणे शिकवणारा चित्रपट
Just Now!
X