News Flash

Video : अडचणींमध्येही प्रेम खुलवणारं ‘सुई धागा’ मधलं पहिलं गाणं प्रदर्शित

या चित्रपटातील पहिलंवहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

मेक इन इंडिया’ या थीमवर आधारित बहुचर्चित ‘सुई धागा’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसापूर्वीच प्रदर्शित झाला. प्रदर्शित झालेला हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला असून नुकतच या चित्रपटातील पहिलंवहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यामध्ये ममता (अनुष्का शर्मा) आणि मौजी (वरुण धवन) यांच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांच्यातील प्रेम रंगविण्यात आलं आहे.

‘यश राज फिल्म्स’ बॅनरअंतर्गत तयार झालेल्या या चित्रपटामध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका असून या चित्रपटाच्या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’चा प्रचार करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच चित्रपटातील ‘चाव लागा है’ हे पहिलंच गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

‘चाव लागा है’ अशा लयदार ओळींमध्ये शब्दबद्ध केलेलं हे गाणं जयपूरमध्ये चित्रीत करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर काही क्षणातच त्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहं.

शरत कटारिया दिग्दर्शित ‘सुई धागा’ हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यानिमित्ताने वरुण आणि अनुष्का पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. वरुण आणि अनुष्काने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा यातील भूमिका अत्यंत वेगळ्या असणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 3:49 pm

Web Title: film sui dhaagas first song chaav laaga released watch video
Next Stories
1 हृतिकच्या फ्लर्टला वैतागून दिशाने सोडला चित्रपट?
2 ‘गरज असताना साऱ्यांनीच पाठ फिरवली’
3 ‘काकस्पर्श’नंतर महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, गिरीश जोशी पुन्हा एकत्र
Just Now!
X