26 February 2021

News Flash

अक्षयला टक्कर देणार मौनी रॉयचा प्रियकर

अक्षय आणि मोहितच्या लूकमध्ये बरेच साम्य असल्याचे दिसते.

अक्षय कुमार, मोहित रैना

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी ‘केसरी’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक काही वेळापूर्वीच प्रदर्शित करण्यात आला. त्याचा हा लूक येत नाही तोवर लगेच टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता आणि मौनी रॉयचा प्रियकर मोहित रैनाच्या आगामी मालिकेतील लूक प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे अक्षयचा चित्रपट आणि मोहितची ही मालिका एकाच कथेवर आधारित आहेत. त्यामुळे अक्षयची ‘गोल्ड’ चित्रपटातील सहअभिनेत्री मौनीचा प्रियकर त्याला एकप्रकारे टक्कर देतोय असे म्हणण्यास हरकत नाही.

वाचा : सॅनिटरी नॅपकिन्सला आपलं म्हणा- अक्षय कुमार

आजवर ऐतिहासिक आणि पौराणिक मालिकांसाठी नावाजला जाणारा मोहित यावेळी सैनिक हविलदर इशर सिंग यांच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘२१ सरफरोश : सारागढी १८९७’ असे नाव असलेली ही मालिका ‘डिस्कव्हरी जीत’ वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. दरम्यान, अक्षय आणि मोहितचा लूक काहीसा एकसारखाच असल्याचे दिसते.

‘२१ सरफरोश : सारागढी १८९७’ मालिका आणि अक्षयचा ‘केसरी’ चित्रपट हे सारागढीच्या युद्धावर आधारित आहेत. सारागढीच्या युद्धाविषयी आजवर बऱ्याच गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. भारतीय सैन्यदलाच्या इतिहासातही या युद्धाविषयी बरेच उल्लेख पाहायला मिळतात. १८९७च्या सप्टेंबर महिन्यात ३६व्या शीख रेजिमेंटचे २१ सैनिक आणि दहा हजार अफगाण सैनिकांमध्ये हे युद्ध झाले होते.

वाचा : ट्विंकलच्या पॅडमॅनची ‘पाळी’ आली लवकर!

अभिमन्यू सिंगच्या कॉन्टिलो पिक्चर्स प्रा. लि.ने मालिकेची निर्मिती केली आहे. आपल्या मातृभूमीची रक्षा करण्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या समर्पित, निःस्वार्थी आणि निर्भय सैनिकाच्या भूमिकेत मोहित दिसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 2:42 pm

Web Title: first look mohit raina in tv show 21 sarfarosh saragarhi 1897
Next Stories
1 ट्विंकलच्या पॅडमॅनची ‘पाळी’ आली लवकर!
2 ऐश्वर्याला आई म्हणणाऱ्याने रेहमानशीही जोडले होते नाते
3 PHOTO : ‘केसरी’मधील अक्षयचा थक्क करणारा लूक पाहिला का?
Just Now!
X