29 May 2020

News Flash

या पाच कारणांमुळे सलमान आणि लुलिया ‘मेड फॉर इच अदर’ !

आत्तापर्यंत या दोघांनीही आपल्या नात्याबद्दल एक शब्दही उच्चारलेला नाही.

एव्हाना बॉलीवूड इंडस्ट्रीत ‘दबंग खान’ सलमान आणि त्याची कथित प्रेयसी लुलिया वेंतुर यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे. सलमान आणि लुलिया वर्षाखेरीस विवाहबद्ध होणार असल्याच्या बातम्या अनेक खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात येत असल्या तरी आत्तापर्यंत या दोघांनीही आपल्या नात्याबद्दल एक शब्दही उच्चारलेला नाही. मात्र, बॉलीवूड चाहते आणि प्रसारमाध्यमांना त्याची अजिबात फिकीर नाही. त्यामुळेच सलमान आणि लुलिया कशाप्रकारे ‘मेड फॉर इच अदर’ आहेत, याबद्दल निरनिराळे तर्कवितर्क लढविण्यास सुरूवात झाली आहे.

लुलियाचेही सिक्स पॅक्स..! 

  •  लुलिया ही बॉलीवूडमध्ये एन्ट्री मिळविण्यासाठी सलमान खानचा आधार घेणाऱ्या अन्य उदयोन्मुख अभिनेत्रींसारखी नाही. मुळात लुलिया आणि सलमानची भेट ती भारत भेटीवर आली असताना झाली. लुलिया ही रोमानियात राहणारी असून ती टेलिव्हिजनवरील सूत्रसंचालक आहे. आत्तापर्यंत ‘ओ तेरी’ चित्रपटातील आयटम साँग वगळता लुलिया बॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसलेली नाही.
  • बॉलीवूड इंडस्ट्रीत नशीब उघडण्यासाठी किंवा ब्रेक मिळविण्यासाठी आजपर्यंत अनेक अभिनेत्रींनी सलमान खानचा आधार घेतला आहे. मात्र, लुलियाची आत्तापर्यंतची वाटचाल पाहता बॉलीवूडमध्ये करिअर करणे, ही तिची महत्त्वकांक्षा असेल असे वाटत नाही. त्यामुळे लुलिया आणि सलमान एकत्र राहण्याचे कारण केवळ प्रेम आणि प्रेमच असल्याचे सांगण्यात येत आहे.
  • सलमान आणि लुलिया या दोघांनी आत्तापर्यंत वैयक्तिक आयुष्यात चढउतार बघितले आहेत. सलमानची प्रेमप्रकरणे हा बॉलीवूडमधील स्वतंत्र अध्याय आहे, तर लुलियाचा यापूर्वी संगीतकार मॉरिस मोगा यांच्याशी विवाह झाला होता.
  • एखादे नाते खुलण्यासाठी दोन्ही व्यक्तींच्या आवडीनिवडी जुळणे खूप महत्त्वाची बाब असते. याबतीत सलमान आणि लुलियाचे ३६ गुण मिळतायतं , असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सलमानला शेती आणि घोडेस्वारीची आवड आहे. लुलियाही रोमानियातील टेलिव्हिजनवर शेतीसंबंधी एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते. याशिवाय, सलमानच्या फार्महाऊसवर लुलिया अनेकदा घोडेस्वारी करताना दिसून आली आहे.
  • लुलियाचे सलमान आणि तिच्या कुटुंबियांबरोबर असलेले भावनिक बंध हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबमधले ‘सुल्तान’चे चित्रीकरण आटपून सलमान आणि त्याची आई सलमा खान मुंबईत परतताना लुलिया त्यांच्याबरोबर होती. लुलिया सलमानच्या आईची यावेळी काळजी घेताना दिसून आली. त्यामुळे सलमानच्या आईला लुलिया सून म्हणून पसंत असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय, प्रिती झिंटाच्या विवाह सोहळ्याच्या स्वागत समारंभात या दोघांनी लावलेली एकत्रित हजेरीही बरेच काही सांगून जाते.

प्रिती झिंटाच्या रिसेप्शनला सलमान आणि लुलिया वेंतुर एकत्र! 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2016 5:41 pm

Web Title: five reasons why salman khan and iulia vantur are made for each other
Next Stories
1 ‘कान’ फेस्टीव्हलमध्ये नवाजुद्दीनची एण्ट्री आणि टाळ्यांचा कडकडाट..
2 ‘थ्री इडियट्स’च्या सिक्वलमध्ये काम करण्यास शर्मन जोशी उत्सुक
3 प्रेम रतन धन पायो आणि शाहरुखला ‘घंटा पुरस्कार’
Just Now!
X