गेम ऑफ थ्रोन्स ही जागातील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणुन ओळखली जाते. या मालिकेचा आठवा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपुर्वी गेम ऑफ थ्रोन्सच्या आठव्या सत्राचा एक टीझर इंटरनेटवर प्रदर्शित करण्यात आला होता. हा टीझर तब्बल २६ दशलक्ष चाहत्यांनी बगितला. इतकंच नाही तर अवघ्या एका दिवसापूर्वी प्रदर्शित केलेल्या या मालिकेच्या ट्रेलरचा आस्वाद अवघ्या २४ तासांमध्ये तब्बल २७ दशलक्ष चाहत्यांनी घेतला. यावरुन गेम ऑफ थ्रोन्सची लोकप्रियता आपल्या ध्यानात येते. ही मालिका एचबीओ वाहिनी व हॉटस्टार या अॅपवर प्रदर्शित केली जाते.

आनंदाची बाब म्हणजे या मालिकेच्या शेवटच्या सत्रात इतर कलाकारांबरोबरच जॉर्ज आर. आर. मार्टिन देखील दिसणार आहेत. गेम ऑफ थ्रोन्स या मालिकेची पटकथा आर. आर. मार्टिन यांच्या ‘द साँग ऑफ आइस अ‍ॅण्ड फायर’ या कादंबरीवरुन तयार करण्यात आली आहे. या मालिकेच्या निर्मितीमध्येही त्यांनी मोलाचे योगदान दिले होते.

जॉर्ज आर. आर. मार्टिन यांनी मालिकेत एखादे पात्र तरी साकारावे अशी इच्छा दिग्दर्शक अ‍ॅलन टेलर यांची होती. ते सातत्याने यासाठी प्रयत्न करत होते. परंतु प्रत्येक वेळी मार्टिन यांनी अभिनय करण्यास साफ नकार दिला. मी एक लेखक आहे. माझ्याकडे अभिनय करण्याची क्षमता नाही. गेम ऑफ थ्रोन्स ही मालिका अनुभवी कलाकार व त्यांच्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखली जाते. त्यामुळे अशा उत्तम अभिनेत्यांच्या गटात त्यांच्यासारखा अभिनय करता न येणारा व्यक्ती शोभणार नाही असे त्यांना वाटत होते. त्यामुळे अ‍ॅलन टेलर यांच्या मागणीला त्यांनी सातत्याने विरोध केला. पुढे ही मागणी केवळ दिग्दर्शकापुरती मर्यादित राहिली नाही तर निर्माते व कलाकारांकडूनही जोर वाढू लागला. शेवटी सर्वांच्या आग्रहाखातर जॉर्ज आर. आर. मार्टिन यांनी मालिकेच्या शेवटच्या सत्रात एक लहानसे पात्र करण्यास होकार दिला आहे.

साम्राज्य निर्माण करणे सोपे असते, परंतु ते टिकवणे हे फार कठीण काम आहे. ते टिकवण्यासाठी आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा विविध पातळींवर प्रयत्न केले जातात. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ म्हणजे अगणित राजकीय ताकद मिळवण्यासाठी सुरू झालेला सत्तेचा खेळ होय. जॉर्ज आर आर मार्टिन यांच्या ‘साँग ऑफ आइस अ‍ॅण्ड फायर’ या कादंबरीवरून या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. २०११ साली सुरू झालेल्या या मालिकेचे आठवे सत्र लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मार्टिन यांनी या कादंबरीचे लिखाण आठ भागांत केले आहे. यांतील प्रत्येक भागावर अनुक्रमे एक सत्र या क्रमाने आत्तापर्यंत सात सत्रांची निर्मिती झाली होती. आता आठव्या सत्राबद्दलही लोकांच्या मनात तेवढीच उत्सुकता आहे.