News Flash

Yuvraj and Hazel Keech Wedding: युवी-हेजलच्या लग्नात निमंत्रितांच्या यादीतून वगळले हे नाव..

युवीने भारतीय संघासाठीही चंदीगढ येथे रिसेप्शनचे आयोजन केले आहे.

भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल किच हे उद्या विवाहबंधनात अडकणार आहेत.

भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल किच हे उद्या विवाहबंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. त्यातच या लग्नाला कोण कोण उपस्थिती लावणार याकडेही सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. या प्रेमीयुगुलाने निवडक लोकांच्या उपस्थितीत लग्न करायचे ठरविले आहे. पण, युवराज सिंगच्या कुटुंबाकडून केली जात असलेली तयारी पाहता हा लग्नसोहळा भव्य असणार यात काहीच शंका नाही. या ‘बिग फॅट पंजाबी वेडिंग’मध्ये पाहुण्यांची गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जातेय. हा विवाहसोहळा चंदीगढ पासून ५० किमी अंतरावर असलेल्या फतेहगढ साहेबच्या गुरुद्वारामध्ये होईल. त्यानंतर दिल्लीत त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन होईल. त्याचसोबत, युवीने भारतीय संघासाठीही चंदीगढ येथे रिसेप्शनचे आयोजन केले आहे. चंदीगढ येथे भारतीय खेळाडू जेथे थांबले आहेत तेथेच युवीने रिसेप्शन ठेवण्याचे ठरविले आहे. त्यामुळे सर्व भारतीय खेळाडू मित्र अगदी आरामात रिसेप्शनला येऊ शकतील याची त्याने पूर्ण काळजी घेतलीय. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला रिसेप्शनचे आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, इंग्लंडच्या खेळाडूंना युवीने आमंत्रण दिलेले नाही.

फोटो गॅलरी: ‘युवराज-हेजल प्रीमियर लीग’ 

वाचा: फराहच्या इशा-यावर नाचणार युवी-हेजल

भारतीय संघासोबत सध्या इंग्लंडच्या संघाचे सामने सुरु आहेत. त्यासाठी हा संघ दोन महिन्यांकरिता भारतात आला आहे. या दोन्ही संघातील तिसरा कसोटी सामना २६ ते ३० नोव्हेंबरमध्ये खेळवला जात आहे. या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी सर्व खेळाडू तणावातून बाहेर पडतील आणि आरामात पार्टीचा आनंद लुटतील. पण, एलिस्टर कुकच्या बाजूने कोणीही या पार्टीला उपस्थित राहणार नाही. खरंतर कुक या पार्टीला येण्याची अपेक्षा केली जात आहे. गेल्याच वर्षी अमिरातीच्या एमसीसी टी २० कपमध्ये युवी आणि कुक एकत्र खेळले होते.

वाचा: युवराजसाठी ‘ये इश्क नही था आसां…’

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री अनुष्का शर्मासुद्धा युवराजच्या पाहुण्यांच्या यादीत आहे. विराट कोहली आणि युवराजची मैत्री तर सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे विराट युवीच्या लग्नाला जाणार यात शंकाच नाही. पण विराटसोबत अनुष्काही युवी-हेजलच्या लग्नाला हजेरी लावणार आहे अशी चर्चा आहे. गेल्या काही काळापासून विराट आणि अनुष्का एकमेकांसोबत जास्तच वेळ व्यतीत करत आहेत. त्यामुळे युवराजच्या लग्नाच्या निमित्ताने विराट आणि अनुष्काही त्यांच्या नात्याचा सर्वांसमोर स्वीकार करतील आणि त्यांच्या नात्याबद्ल सर्वांसमोर काही खास घोषणा करण्याची शक्यता आहे. विराट आणि अनुष्काच्या नात्याची सद्यस्थिती पाहता अशीच शक्याता वर्तविण्यात येत आहे की हे दोघंही त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करुन लवकरच लग्न करण्याचाही निर्णय घेतील. त्यामुळे विराट-अनुष्काकडेच सध्या अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

वाचा: युवराज-हेजलच्या लग्नात संगीत, मेहंदी आणि बरंच काही..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 9:05 am

Web Title: guess who is not invited to yuvraj singh and hazel keech wedding
Next Stories
1 मराठी चित्रपटाच्या संगीताला बॉलीवूडचा साज
2 Yuvraj and Hazel Keech Wedding: युवराजसाठी ‘ये इश्क नही था आसां…’
3 सेलिब्रिटी क्रश: ‘.. आणि माझा पोपट झाला’