28 February 2021

News Flash

गली बॉयमधला एमसी शेर रिलेशनशिपमध्ये

गली बॉय चित्रपटातील अफलातून कामामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सिद्धांत चतुर्वेदीच्या खासगी आयुष्यातही आता सर्वसामान्यांना रस निर्माण झाला आहे.

सिद्धांत चतुर्वेदी

गली बॉय चित्रपटातील अफलातून कामामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सिद्धांत चतुर्वेदीच्या खासगी आयुष्यातही आता सर्वसामान्यांना रस निर्माण झाला आहे. त्यामुळेच गली बॉयच्या यशानंतर घेण्यात आलेल्या मुलाखतीत त्याला त्याच्या लव लाइफ संदर्भात प्रश्न विचारला. आणि सिद्धांतनेही चक्क आढेवेढे न घेता आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले. सध्या रणवीर सिंहचं नाही तर गली बॉयमधले अन्य कलाकारही चित्रपटाच्या यशामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहेत. विशेषत: सिद्धांतच्या एमसी शेरवर केवळ प्रेक्षकांनीच नाही तर चित्रपट समीक्षकांनीही कौतुकाचा वर्षाव केला आहे.

खासगी आयुष्यासंदर्भात मुलाखतीत “माझी प्रियसी सिनेजगतातीलच आहे” अशी कबुली सिद्धांतने दिली. परंतु तिच्या नावासह इतर तपशील देण्यास त्याने साफ नकार दिला. योग्य वेळ आल्यावर तिच्याबाबत सर्वांना कळेलच असे म्हणून त्याने विषय बदलला.

‘गली बॉय’.. धारावीच्या गल्ल्यांमध्ये लहानाचा मोठा झालेल्या एका रॅपरची कथा आहे. समाजामध्ये दोन वर्ग निर्माण झाले आहेत. एक उच्चभ्रू लोकांचा तर दुसरा गरीबी आणि दारिद्रय यांच्याशी संघर्ष करणारा. दारिद्र्याच्या गर्तते अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीची कथा, त्याचं दु:ख मुराद अर्थात गली बॉय (रणवीर सिंह) त्याच्या रॅपमधून समाजासमोर मांडतो. या दु:खाला वाचा फोडत असतानाच त्याचं नशीब त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवतं आणि तो ठरतो देशातला सर्वात प्रसिद्ध असा रॅपर. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदीने एमसी शेर ही व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटात कलाकारांच्या अभिनयासोबत उत्तम संवादकौशल्य, नेपथ्य आणि संगीत यांची उत्तम सांगड घालण्यात आली. त्यामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर तब्बल १०० कोटींचा आकडा पार केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 5:56 pm

Web Title: gully boy mc sher siddhant chaturvedi reveals he is in a relationship
Next Stories
1 Viral video : दिसतं तसं नसतं!, कंगनाची घोडेस्वारी पाहून तुम्हालाही हसू येईल
2 Oscar 2019 : ‘ऑस्कर पुरस्कारा’चे हे नियम माहित आहेत का ?
3 जवान दहशतवाद्यांना उत्तर देतील – कपिल शर्मा
Just Now!
X