News Flash

जया बच्चन यांच्यामुळे अभिषेक-करिश्माचा साखरपुडा मोडला का?

अभिषेकने २००७ रोजी ऐश्वर्या रायसोबत लग्न केलं

कलाविश्वामध्ये अमिताभ बच्चन या नावाचं फार मोठं प्रस्थ आहे. आजही त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजतात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या मुलाने अभिषेक बच्चनने कलाविश्वात पदार्पण केलं. मात्र असंख्य चित्रपट करुनदेखील त्याच्या वाट्याला म्हणावं तसं यश आलं नाही. अभिषेक कलाविश्वामध्ये सक्रीय नसला तरीदेखील त्याच्याविषयीच्या चर्चा बऱ्याच वेळा रंगताना दिसतात. अभिषेकने २००७ रोजी ऐश्वर्या रायसोबत लग्न केलं. विशेष म्हणजे ऐश्वर्यापूर्वी अभिषेक अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत लग्नगाठ बांधणार होता. त्यांचा साखरपुडाही झाला होता. इतकंच नाही तर त्यांच्या लग्नाच्या पत्रिकाही वाटण्यात आल्या होत्या. परंतु ऐनवेळी हा साखरपुडा मोडण्यात आला. हा साखरपुडा मोडण्यामागे जया बच्चन कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं.

२००२ साली अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशी अभिषेक आणि करिश्मा यांचा साखरपुडा करण्यात आला होता. मात्र साखरपुडा झाल्यानंतर अचानक हा साखरपुडा मोडण्यात आला. विशेष म्हणजे जया बच्चन यांच्या काही अटी असल्यामुळे अभिषेक- करिश्माचं लग्न होऊ शकलं नाही.

वाचा :  आलिया आर्थिक गुंतवणूक कशात करते माहितीये?

आपल्या सुनेने लग्नानंतर चित्रपटांमध्ये काम करणं जया बच्चन यांना मान्य नव्हतं आणि करिश्मादेखील काम सोडण्यास तयार नव्हती. त्यामुळेच या दोघींमध्ये मतभेद निर्माण झाले आणि याच कारणामुळे दोन्ही कुटुंबामधील संबंध बिघडले. परिणामी, हा साखरपुडा मोडण्यात आला. त्यानंतर करिश्माने संजय कपूरसोबत लग्न केलं.

वाचा : तूप,बटर खाऊनही भूमी राहते फिट; असा आहे भूमीचा फिटनेस फंडा

दरम्यान, करिश्माने संजय कपूरसोबत लग्न केल्यानंतर अभिषेकनेदेखील ऐश्वर्या रायसोबत लग्न केलं. अभिषेक-ऐश्वर्याला आराध्या नावाची एक लहान मुलगी आहे. तर करिश्माचा संजय कपूरसोबत घटस्फोट झाला असून ती तिच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 9:25 am

Web Title: happy birthday abhishek bachchan love life age now then aishwarya rai karishma kapoor ssj 93
Next Stories
1 ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात
2 दाऊदसोबत अनिल कपूरचा ‘तो’ फोटो, सोनमने दिलं स्पष्टीकरण
3 ..अन् सहप्रवाशाने केला अशोक मामांचा अपमान
Just Now!
X