अभिनेत्री कतरिना कैफने तिचा आणि रणबीर कपूरचा आगामी सिनेमा ‘जग्गा जासूस’चा पहिला ट्रेलर फेसबुकद्वारे प्रेक्षकांसमोर आणला आहे. ३ मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये रणबीर, जग्गा नावाच्या एका गुप्तहेराची भूमिका बजावत आहे. जग्गाची अडखळत बोलण्याची सवयीमुळे ट्रेलरमध्ये तो गाण्याच्या स्वरूपात समोरच्याशी गप्पा मारताना दिसतो. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा शोध घेताना दिसत आहे.
महिमा चौधरीच्या भावाचा आणि वहिनीचा अपघातात मृत्यू
सिनेमात रणबीरची व्यक्तिरेखा हे जाणू पाहत असते की त्याच्या वडिलांनी त्याला लहानपणी एकटं का सोडलं? साहस आणि मनोरंजनाने परिपूर्ण असलेल्या या सिनेमात रणबीर आणि कतरिना एकापेक्षा एक स्टंक करताना दिसत आहेत. ट्रेलरच्या एका दृश्यात तर रागात असलेली कतरिना आपल्या पूर्वाश्रमिच्या प्रियकराच्या म्हणजे रणबीर कपूरच्या कानशिलात लगावताना दाखवण्यात आली आहे.
दिग्दर्शक अनुराग बासु ‘बर्फी’ या त्याच्या सिनेमानंतर पुन्हा एकदा रणबीर कपूरसोबत काम करत आहे. सिनेमा सुपरहिट होईल अशी आशा धरून असलेला रणबीर या सिनेमाचा निर्माताही आहे. रणबीर आणि कतरिनाच्या चाहते या सिनेमाची फार आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा आधीच ३ वर्षांनंतर प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शक अनुरागच्या या सिनेमात गोविंदाही पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावताना दिसणार आहे.
रणबीर कपूर आणि कतरिनाची जोडी पहिल्यांदा २००९ मध्ये ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या सिनेमात दिसली होती. यानंतर २०१० मध्ये आलेल्या प्रकाश झा यांच्या ‘राजनीति’ सिनेमातही हे दोघं एकत्र दिसले होते. या दोघांची ऑनस्क्रिन जोडी प्रेक्षकांनी नेहमीच पसंत केली आहे. पण त्यांच्या ऑनस्क्रिन जोडीपेक्षा चर्चा झाली ती ऑफस्क्रिनचीच. २०१६ मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं आणि दोघांचे रस्ते वेगळे झाले. ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच हे दोघं जग्गा जासूस या सिनेमातून एकत्र येत आहेत. हा सिनेमा येत्या १४ जुलैमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Mubarakan song Hawa Hawa: अर्जुन तिचा बॉयफ्रेंड बनण्यासाठी तयार