News Flash

Big Boss 14: जॅस्मिनने राहुलच्या अंगावर फेकले पाणी, नेटकऱ्यांनी सुनावले

अनेकांनी राहुलला पाठिंबा दिला आहे.

सध्या छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो बिग बॉस १४ चर्चेत आहे. या शोमध्ये बुधवारी वर्ल्ड टूर टास्क देण्यात आला होता. टास्क दरम्यान राहुल वैद्य आणि जॅस्मिन भसीन यांच्यामध्ये वाद सुरु होतो. त्यानंतर जॅस्मिनला प्रचंड राग येतो. ती रागाच्या भरात राहुलला सुनावते आणि त्याच्या अंगावर पाणी फेकते.

बिग बॉस १४च्या घरात कॅप्टन होण्यासाठी घरातील स्पर्धकांना टास्क देण्यात येतो. रेड झोनमधील स्पर्धकांना ग्रीन झोनमध्ये असणाऱ्या स्पर्धकांच्या बॅगा घ्यायच्या होत्या. त्यावेळी राहुल वैद्यने जॅस्मिनला ‘तुला दुखापत होईल बॅग सोडून दे’ असे म्हटले होते. जॅसमिनला राहुलचे बोलणे आवडले नाही तिने राहुल धमकावत असल्याचे म्हटले. ही कोणत्याही प्रकारची धमकी नसल्याचे राहुलने म्हटले.

दरम्यान जॅस्मिनने रागाच्या भरात राहुलच्या अंगावर पाणी फेकले. त्यानंतर राहुलने देखील संताप व्यक्त केला. घरातील अनेक सदस्यांनी राहुलला पाठिंबा दिला. कविता, पवित्रा, निक्की, जान, नैना यांनी राहुलला पाठिंबा दिला. जॅस्मिनने राहुलच्या अंगावर पाणी फेकताच तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेकांनी तिला सुनावले.

एका यूजरने तर जॅस्मिक प्रत्येकवेळी वुमन कार्ड घेऊन फिरत असते असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने बॅग खेचण्यामध्ये चुकीचे काय आहे? आणि या सगळ्यामध्ये स्त्री आणि पुरुष कुठून आलं? असे म्हणत अनेकांनी सुनावले आहे. अनेकांनी राहुलला पाठिंबा दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 4:18 pm

Web Title: jasmin bhasin troll rahul vaidya gets support avb 95
Next Stories
1 शाहरुखचा ‘पठाण’ पुढच्या दिवाळीला होणार रिलीज?
2 ब्रॅड पीटने लग्नाचं अमिष दाखवून फसवलं; महिलेने दाखल केली तक्रार
3 Video: ‘तारक मेहता…’मधील जेठालालला भेटली नवी दया
Just Now!
X