News Flash

‘सुपर ३०’ची धुरा कबीर खान यांच्या खांद्यावर ?

या चित्रपटाचं चित्रीकरण ९० टक्के पूर्ण झालं असून केवळ १० टक्के चित्रीकरण बाकी आहे.

कबीर खान

लैंगिक गैरवर्तणुकीच्या वादात सापडलेल्या दिग्दर्शक विकास बहलकडून आगामी ‘सुपर ३०’ हा चित्रपट निसटून गेल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या चित्रपटाचं राहिलेलं उर्वरित चित्रीकरण चित्रपट दिग्दर्शक कबीर खान पूर्ण करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, ‘सुपर ३०’ हा चित्रपट पटनाचे सुप्रसिद्ध गणितज्ञ आनंद कुमार याच्या जीवनावर आधारित असून या चित्रपटाचं अभिनेता हृतिक रोशन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण ९० टक्के पूर्ण झालं असून केवळ १० टक्के चित्रीकरण बाकी आहे. परंतु विकास बहलवर करण्यात आलेल्या विनयभंगाच्या आरोपामुळे हे चित्रीकरण अपूर्ण राहिलं आहे. जर विकासने हा चित्रपट सोडला तर मीदेखील चित्रपट करणार नाही, अशी धमकी हृतिकने दिल्यामुळे हे चित्रीकरण रखडल्याचं सांगण्यात येत आहे.

‘सुपर-३०’ चे केवळ १० टक्के चित्रीकरण बाकी असून हे चित्रीकरण कबीर खान पूर्ण करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असून एवढ्या कमी दिवसात हे चित्रीकरण कसं पूर्ण होणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, हा चित्रपट २५ जानेवारी २०१९ ला प्रदर्शित होणार असून यात हृतिक रोशन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटाच्या पुढील टप्प्याच्या दिग्दर्शनासाठी कबीर खान यांच्या नावाची जरी चर्चा रंगत असली तरी ते ‘८३’ या आगामी बायोपिकवरही काम करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 1:14 pm

Web Title: kabir khan steps in to complete hrithik roshan super 30
Next Stories
1 Video : महिला कुस्तीपटूकडून राखी सावंतला धोबीपछाड
2 अखेर वरुणनं दिली नताशासोबतच्या नात्याची कबुली
3 इटलीमध्ये अशापद्धतीने सुरु आहे दीपिका-रणवीरच्या लग्नाची लगबग
Just Now!
X