05 March 2021

News Flash

सुशांत मृत्यू प्रकरण: “सुशांतचे पैसे तू उधळलेस बहिणीने नाही”; अभिनेत्रीने केली रियावर टीका

रिया चक्रवर्तीने शेअर केलेल्या 'त्या' चॅटवर अभिनेत्रीने केली टीका

टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. जगभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोक मतं मांडत असते. यावेळी तिने सुशांत मृत्यू प्रकरणावरुन अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर निशाणा साधला आहे. खोटं बोलून तुला नेमकं काय साध्य करायचंय? असा प्रश्न तिने रियाला विचारला आहे.

अवश्य पाहा – ‘जनता तुला माफ करणार नाही’; रियाला पाठिंबा देणाऱ्या आयुषमानवर संतापला अभिनेता

रियाने अलिकडेच सुशांतच्या काही वॉट्सअॅप चॅटचे स्क्रिनशॉट्स सोशल मीडियावर शेअर केले होते. सुशांत आणि त्याच्या बहिणीमध्ये भांडण असल्याचा दावा तिने या चॅटमार्फत केला होता. तिच्या या कृतीवर काम्याने संताप व्यक्त केला आहे. “तुला नेमकं काय साध्य करायचं आहे? बहीण-भावामध्ये भांडणं होतच असतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो तुझ्यासोबत राहात होता बहिणीसोबत नाही. तू त्याच्या क्रेडिट कार्ड्सचा वापर करत होतीस त्याची बहिण नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन काम्याने रियावर टीका केली आहे.

…तर रणबीरला ‘रेपिस्ट’ आणि दीपिकाला ‘सायको’ का नाही म्हणत? कंगनाने विचारला प्रश्न

अभिनेता सुशांत सिंह राजपुत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीला दोषी समजले जात आहे. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रियाविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले आहेत. यामध्ये पैसे उकळल्याचा, मानसिक त्रास दिल्याचा आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत. या प्रकरणी सध्या ईडी आणि CBI मार्फत तिची चौकशी केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 12:30 pm

Web Title: kamya punjabi comment on sushant singh rajput death case mppg 94
Next Stories
1 …तर रणबीरला ‘रेपिस्ट’ आणि दीपिकाला ‘सायको’ का नाही म्हणत? कंगनाने विचारला प्रश्न
2 सुशांत सिंह आत्महत्या: रिया चक्रवर्ती पुन्हा ईडी कार्यालयात दाखल
3 करोना काळात छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अडकली लग्न बंधनात
Just Now!
X