News Flash

‘तेजस’मध्ये कंगना; होणार एअर फोर्स पायलट

बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत सध्या 'पंगा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत सध्या ‘पंगा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘पंगा’ला प्रेक्षक आणि समिक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट एका महिला कबड्डीपटूच्या आयुष्यावर आधारित आहे. गेल्या काही काळात कंगना प्रामुख्याने महिला प्रधान चित्रपटांना प्रधान्य देताना दिसत आहे. येत्या काळात तिचा आणखी एक महिला प्रधान चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

अवश्य पाहा – Photo : १३ किलो वजन कमी करणाऱ्या ‘फॅट’ अभिनेत्रीचा ‘फीट’ लूक

या आगामी चित्रपटाचे नाव ‘तेजस’ असे आहे. या चित्रपटामध्ये कंगना भारतीय बनावटीच्या ‘तेजस’ या फायटर प्लेनच्या पायलटची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरु आहे. तेजसचे दिग्दर्शन प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक सर्वेश मेवरा करत आहेत. तर निर्मितीची जबाबदारी रॉनी स्क्रूवाला यांनी स्विकारली आहे.

अवश्य वाचा – कंगना रनौतने घेतला विराट कोहलीशी पंगा

अवश्य वाचा – दीपिका पदुकोणने रचला इतिहास; ठरली असा विक्रम करणारी पहिली भारतीय स्त्री

तेजसबाबत काय म्हणाली कंगना?

“गेल्या अनेक वर्षांपासून मला भारतीय सैन्यावर आधारित चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा होती. मात्र अशा प्रकारचा कुठलाही चित्रपट अद्याप माझ्या वाट्याला आलेला नव्हता. परंतु ‘तेजस’ या चित्रपटामुळे माझी ती इच्छा पूर्ण झाली. आम्ही या चित्रपटावर जीव तोडून मेहनत करतोय. आणि पंगा या चित्रपटाप्रमाणे तुम्हाला तेजस देखील आवडेल अशी मला खात्री आहे.” असे म्हणत कंगनाने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. ‘तेसज’ येत्या जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 3:42 pm

Web Title: kangana ranaut to play an air force pilot in tejas mppg 94
Next Stories
1 शाहरुखचा ‘मन्नत’ हा बंगला विकत घ्यायचा होता सलमानला, पण..
2 ‘तान्हाजी’ची विक्रमी कमाई; दुसऱ्या आठवड्यात देखील हाऊसफुल
3 ‘देशी पोलिसांच्या आधी येणार विदेशी पोलीस’
Just Now!
X