कॉमेडियन कपिल शर्माने छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन केलंय. मोठ्या ब्रेकनंतर ‘द कपिल शर्मा शो’ सुरू झाला आणि टीआरपीच्या यादीत हा पहिल्या पाच क्रमांकामध्ये स्थान पटकावण्यात तो यशस्वी ठरला. कपिलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन’ने सर्वाधिक पाहिला गेलेल्यांपैकी एक स्टँड अप कॉमेडियन म्हणून कपिलचा सन्मान केला आहे.
सोशल मीडियावर कपिल शर्माच्या एका फॅनपेजने प्रमाणपत्र शेअर केलं आहे. विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी ओळखला जाणाऱ्या कपिलला याआधीही बरेच पुरस्कार मिळाले आहेत. २०१७ मध्ये ‘फोर्ब्स इंडिया’च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या टीव्ही सेलिब्रिटींच्या यादीत कपिलचा समावेश होता.
सहकलाकार सुनील ग्रोवरशी वाद झाल्याने कपिलचा कॉमेडी शो बंद पडला होता. त्यानंतर एक वर्ष त्याने ब्रेक घेतला. या काळात व्यसनाधीन झाल्याने तो व्यसनमुक्त केंद्रातही गेला होता. त्यानंतर त्याने पुन्हा शो सुरू केला मात्र दोन चार एपिसोडनंतर तो पुन्हा बंद पडला होता. आता दमदार टीमसह त्याने कार्यक्रम सुरू केला असून प्रेक्षकांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 16, 2019 7:50 pm