News Flash

“आता अँटीबॉडीज लोड होत आहेत”; कार्तिक आर्यनने घेतली करोनाची पहिली लस

करोनाची पहिली लस घेतल्यानंतर कार्तिक आर्यनने एक फोटो शेअर केलाय. मुंबईतल्या खार स्थित पीडी हिंदुजा हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये त्याने करोनाची पहिली लस घेतली.

करोनाची पहिली लस घेतल्यानंतर कार्तिक आर्यनने एक फोटो शेअर केलाय. मुंबईतल्या खार स्थित पीडी हिंदुजा हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये त्याने करोनाची पहिली लस घेतली.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर आता दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. अशातच करोना लस घेणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे. यात बॉलिवूडमधील कलाकार सुद्धा मागे नाहीत. अनेक सेलिब्रिटींनी करोनाची पहिली लस घेतलीय. नुकतंच बॉलिवूड अभिनेत कार्तिक आर्यनने सुद्धा करोनाची पहिली लस घेतली आहे.

अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर बराच सक्रिय असतो. तो नेहमीच त्याचे वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. आता नुकतंच त्याने करोनाची पहिली लस घेतल्यानंतर एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. मुंबईतल्या खार स्थित पीडी हिंदुजा हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये त्याने करोनाची पहिली लस घेतली. याचा फोटो शेअर करताना त्याने एक कॅप्शन देखील लिहिलीय. “आता अँटीबॉडीज लोड होत आहेत..”, असं त्याने या कॅप्शनमध्ये लिहिलंय. पण, लस जरी घेतली असली तरी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन कार्तिक आर्यनने त्याच्या चाहत्यांना केलंय.

कार्तिक आर्यनने शेअर केलेल्या या फोटोवर फॅन्सनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय. काही फॅन्सनी तर त्याला काळजी घेण्यासाठी सांगत कमेंट्स केल्या आहेत. तर काही फॅन्सनी त्याला ‘नॅशनल क्रश’ म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो हॉरर-कॉमेडी फिल्म ‘भूल भुलैया 2’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारेय. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री कियारा आडवाणी, परेश रावल, आणि राजपाल यादव सुद्धा झळकणार आहेत. या चित्रटाचं दिग्दर्शन अनीस बज्मी हे करत आहेत. 2009 मध्ये रिलीज झालेल्या अक्षय कुमार, विद्या बालन आणि शाइनी आहूजा स्टारर ‘भूल भुलैया’ चा हा सीक्वल असणार आहे. याशिवाय तो करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचा ‘दोस्ताना २’ मध्ये देखील झळकणार होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादामुळे त्याला चित्रपटातून आऊट करण्यात आलं.

सोबतच ‘धमाका २’ मध्ये सुद्धा कार्तिक आर्यन झळकणार आहे. हा चित्रपट येत्या ऑगस्टमध्ये रिलीज होऊ शकतो, असं बोललं जातंय. थिएटरसह ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणारा कार्तिक आर्यनचा हा पहिला चित्रपट ठरणार आहे. विशेष म्हणजे कार्तिक आर्यनने केवळ १० दिवसात या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली होती. या चित्रपटाची शूटिंग बहुतांश इनडोअरमध्ये झाली असून यात कार्तिक आर्यन एका न्यूज अॅंकरची भूमिका साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 2:03 pm

Web Title: kartik aaryan makes snazzy entry exit covid 19 vaccination centre greets paps distance prp 93
Next Stories
1 मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांसच्या ‘सत्यनारायण की कथा’ चित्रपटात झळकणार कार्तिक आर्यन
2 …म्हणून शाहरुख खान अक्षय कुमारसोबत काम करत नाही; किंग खानने केला होता खुलासा
3 “इंडिया हे ब्रिटिशांनी दिलेलं गुलामगिरीचं नाव”; कंगना रणौतने देशाच्या नावावरून केलं मोठं विधान
Just Now!
X