News Flash

बॉलीवूडचे तिन्ही खान अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत- अमिताभ बच्चन

अमिताभ यांनी वयाची पन्नाशी पूर्ण करत असलेल्या खान बंधूंना आधीचं वाढदिवसाच्या शुभेच्छासुद्धा दिल्या.

बॉलीवूड शहनशाह अमिताभ बच्चन यांनी काल वयाची त्र्याहत्तरी पूर्ण केली. त्यापाठोपाठ आता बॉलीवूडचे तिन्ही खानसुद्धा यावर्षी वयाची पन्नाशी गाठत आहेत.
आपल्या वाढदिवसानिमित्त काल अमिताभ यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी तिन्ही खानांच्या बॉलीवूडवर असलेल्या वर्चस्वाबद्दल आम्ही त्यांना प्रश्न विचारला. त्यावर अमिताभ म्हणाले की, ते खूप चांगलं काम करतायतं. पुढेही असेचं काम त्यांनी करत राहावे अशी माझी इच्छा आहे. अनेकांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळतेय. प्रेरणा घेण्यासाठी हे तिघही चांगले स्त्रोत आहेत. माझ्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. इतकेच नाहीतर अमिताभ यांनी वयाची पन्नाशी पूर्ण करत असलेल्या य़ा खान बंधूंना आधीचं वाढदिवसाच्या शुभेच्छासुद्धा दिल्या.
आमिर मार्चमध्ये पन्नास वर्षांचा झाला असून, शाहरुखचा नोव्हेंबर तर सलमानचा डिसेंबरमध्ये वाढदिवस आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 10:47 am

Web Title: khans are an inspiration to many amitabh bachchan
Next Stories
1 गुलाम अलींचा मुद्दा राजकीय झालायं- अमिताभ बच्चन
2 महानायक अमिताभ बच्चन यांचे प्रसिद्ध संवाद
3 ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात मराठमोळा पोवाडा
Just Now!
X