News Flash

रिलेशनशिप स्टेटसबद्दल कियारा म्हणते, “लग्न होईपर्यंत मी…”

"सिद्धार्थला डेट करतेयस का?"; नेहा धुपियाच्या प्रश्नावर कियाराने केला अजब खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रामुळे चर्चेत आहे. कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करत असून दोघं लवकरच लग्न देखील करतील अशा चर्चा सर्वत्र आहेत. या चर्चांवर कियाराने सर्वांनाच चकित करणारं उत्तर दिलं. “होय लग्न होईपर्यंत मी सिंगलच राहणार आहे.” असं ती म्हणाली.

अवश्य पाहा – ‘भाजपाला मत द्या अन्यथा लस मिळणार नाही?’; भाजपाच्या जाहिरनाम्यावर दिग्दर्शकाचा सवाल

कियारा लवकरच ‘लक्ष्मी बॉम्ब’ या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये नेहाने तिला तू खरंच सिद्धार्थला डेट करतेयस का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर कियाराने देखील गंमतीशीर उत्तर दिलं.

अवश्य पाहा – ‘घरात १० दिवस बंद राहून पाहा मग कळेल’; ‘बिग बॉस’ स्पर्धक ट्रोलर्सवर संतापली

ती म्हणाली, “मी सिद्धार्थला डेट करत नाहीये. कारण मी रिलेशनशिपमध्ये आहे. मी माझ्या कामासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यामुळे एकटी असूनही माझं आयुष्य लग्न झालेल्या महिलेसारखंच झालं आहे. सध्या मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करणार आहे. भविष्यात कोणावर प्रेम जडल तर पाहू. तुम्हाला सर्वांना कळेलच. कारण चाहत्यांपासून मी काहीही लपवून ठेवत नाही.” सिद्धार्थ आणि कियारा येत्या काळात शेरशाह या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो गेल्या काही काळात व्हायरल झाले होते. या फोटोंच्या पार्श्वभूमीवर दोघं एकमेकांना डेट करतायेत की काय? अशा चर्चा चाहत्यांमध्ये रंगल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 4:50 pm

Web Title: kiara advani opens up on her relationship status with sidharth malhotra mppg 94
Next Stories
1 ‘मुद्दा लोकांना हसवण्याचा नाही…’, मुकेश खन्नांनी दिले कपिल शर्माला उत्तर
2 शर्मिला राजाराम ‘ब्रेकिंग न्यूज’च्या मागे; नेमकं काय आहे प्रकरण?
3 ‘भाजपाला मत द्या अन्यथा लस मिळणार नाही?’; भाजपाच्या जाहिरनाम्यावर दिग्दर्शकाचा सवाल
Just Now!
X