News Flash

“…तर पुढील १०० वर्ष देशात विकास होणार नाही”; अभिनेत्याची धक्कादायक भविष्यवाणी

अभिनेत्याने देशातील विकासावर केली टीका

अभिनेता कमाल खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने देशाच्या विकासाबात आपलं मत व्यक्त केलं आहे. पुढील १०० वर्ष आपल्या देशाचा विकास होऊ शकत नाही अशी धक्कादायक भविष्यवाणी त्याने केली आहे.

काय म्हणाला केआरके?

“ज्या देशांत हॉस्पिटल्स, प्रयोगशाळा, डॉक्टर्स, राजकारणी आणि इतर उद्योगातील लोक इतका भ्रष्टाचार करतात, तो देश कधीही प्रगती करु शकत नाही. भ्रष्टाचार असाच वाढत राहीला तर पुढील १०० वर्षे आपल्या देशात विकास होऊ शकणार नाही. हे दुर्दैवी पण ते सत्य आहे.” अशा आशयाचे ट्विट केआरकेने केले आहे.

कमाल खानचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी या भविष्यवाणीसाठी केआरकेवर जोरदार टीका देखील केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 6:56 pm

Web Title: krk comment on development of india mppg 94
Next Stories
1 “त्यांना आपली जमीन बळकावायची आहे”; अभिनेत्री चीनवर संतापली
2 “त्या अपघातानंतर माझं करिअर उध्वस्त झालं”; ‘जोश’ फेम अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
3 “एका काल्पनिक कथेवर इतका गोंधळ का?”; एकताच्या समर्थनार्थ हिना खान मैदानात
Just Now!
X