बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. त्यामुळे सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये तिचं कायम नाव घेतलं जातं. मान्यता अनेकदा तिच्या कुटुंबासोबतचे किंवा स्वत:चे फोटो शेअर करत असते. यामध्येच तिने तिचा एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोवर संजयची लेक त्रिशाला दत्तनेदेखील कमेंट केली आहे.
मान्यताने ग्रीन आणि ब्लू रंगाच्या ट्यूब ड्रेसमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती निवांतपणे आराम करताना दिसत आहे. तिच्या या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत.मात्र, या सगळ्या त्रिशालाची कमेंट चर्चेत आली आहे.
आणखी वाचा- तुम्हीही घेऊ शकता अनन्यासारखा ड्रेस; किंमत आहे कमी
मान्यताचा हा फोटो पाहिल्यानंतर त्रिशालाने त्यावर ‘ओह व्वा’ अशी कमेंट केली आहे. सोबतच किसची इमोजीदेखील शेअर केली आहे. त्रिशाला ही संजय दत्तच्या पहिल्या पत्नीची मुलगी असून मान्यतासोबत तिचं मैत्रीचं नातं आहे. दरम्यान, त्रिशाला ही सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा ती तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 7, 2021 12:09 pm