बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. माधुरी तिच्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. माधुरीने नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
माधुरीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये माधुरी तिचे पती डॉ श्रीराम नेने आणि मुलं अरिन, रायन दिसत आहेत. व्हिडीओमध्ये माधुरी गाणे गात आहे. तिचे पती हे गिटार वाजवत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे माधुरीचा मुलगा पियानो वाजवताना दिसत आहे. “मला आशा आहे की तुम्हाला हा नक्की आवडेल” अशा आशयाच कॅप्शन माधुरीने हा व्हिडीओ शेअर करत दिल आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा- Video : माय-लेकाची सुपर जोडी! सलमानने आईसोबत धरला ‘या’ गाण्यावर ताल
माधुरी या व्हिडिओमध्ये म्हणते की, आज मी तुम्हाला लॉकडाउनच्या काळातील माझ्या आयुष्यातील एक मजेदार भाग दाखवणार आहे. जेव्हा आपण लॉकडाउनमध्ये घरी बसलो आणि कुटुंबीयांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत होतो तेव्हा या काळात काय करायला पाहिजे? आम्ही बाहेर जाऊन खाऊ शकत नव्हतो किंवा सुट्टीच्या दिवशी कुठे जाऊ शकत नव्हतो. म्हणून घरीच गोष्टी मनोरंजक करण्याच्या आम्ही निर्णय घेतला.