News Flash

धकधक गर्लने घेतला करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस

आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली माहिती

देशात सध्या लसीकरणाची मोहीम सुरु आहे. अनेक सेलिब्रिटींनी लस घेतली आहे. अभिनेत्री माधुरी दिक्षीतनेही आज लस घेतली. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरु हा फोटो शेअर केला आहे.

माधुरी दिक्षीत यांनी आज करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांनी याबद्दल आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमधून त्यांनी पात्र असलेल्या सर्वांना लस घेण्याचं आवाहनही केलं आहे.

माधुरीसोबतच अनेक बॉलिवूड कलाकारांनी लस घेतली. मलायका अरोरा, सैफ अली खान, सतिश शाह, अनिल कपूर यांचाही या यादीत समावेश आहे. देशात १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे.

सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशात आज सकाळी पूर्ण झालेल्या २४ तासात १ लाख ३० हजार ९०७ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे देशातल्या एकूण बाधितांची संख्या आता २८ लाख १३ हजार ६५८ वर पोहोचली आहे. तर देशात २ लाख १९ हजार २७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज सकाळपर्यंत देशभरात २,८१२ मृत्युंची नोंद झाली तर मृत्युदर १.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे. आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 8:12 pm

Web Title: madhuri dixit take 2nd jab of corona vaccine today vsk 98
Next Stories
1 मुलाचं नाव AbRam का ठेवलं?; शाहरुख खानने केला खुलासा
2 “मी देवीला प्रार्थना केली होती की मला प्रत्येक हिंदू मंदिराचा आवाज बनव”- अनुराधा पौडवाल
3 ‘राधे’च्या ‘सिटी मार’साठी सलमान अल्लु अर्जुनला म्हणाला Thank You..!
Just Now!
X