बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीचं नाव हे अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव होतं. बॉलिवूडचा किंग खान शाहरूखच्या ‘परदेस’ या चित्रीपटात मुख्य भूमिका साकारत महिमाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पहिल्याच चित्रपटातून महिमाची तुलना ही माधुरी दीक्षितशी करण्यात आली होती. काही सुपरहिट चित्रपटांनंतर महिमा बॉलिवूड आणि लाइमलाईटपासून लांब गेली. मात्र, आता महिमा एका मुलाखतीमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये तिने खुलासा केला की राम गोपाल वर्मा यांनी तिला ‘सत्या’ या चित्रपटातून काही न सांगता काढून टाकले होते

महिमाने नुकतीच ‘बॉलिवूड बबल’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने “जेव्हा मी ‘परदेस’ हा चित्रपट करत होती, तेव्हा मला ‘सत्या’ची ऑफर दिली होती. राम गोपाल वर्मा मला भेटले आणि म्हणाले की “मी एक चित्रपट करत आहे. यात एक गुंड आहे, आणि त्यात मुलीची एक भूमिका असून ती खूप मोठी अशी नाही.” मी चित्रपटाची पटकथा वाचली आणि ती मला आवडली. ‘परदेस’चे दिग्दर्शक सुभाष घाई यांनी मला हा चित्रपट करण्यास नकार दर्शविला होता. मात्र, हा चित्रपट मला करायचा होता आणि यावर मी ठाम होते.”

narendra modi uddhav thackeray (2)
मोदींनी उद्धव ठाकरेंना पुन्हा साद घातलेली? संजय राऊत म्हणाले, “दिल्लीतल्या त्या बैठकीत पंतप्रधानांनी…”
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Jayant Patil on Ajit pawar letter
‘सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही’, अजित पवारांचं म्हणणं खरं; जयंत पाटील पुढे म्हणाले…
jayant patil and ajit pawar
अर्थसंकल्पातील तरतुदींवरून जयंत पाटील आक्रमक; सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हणाले, “बाटाचा बूट…”

ती पुढे म्हणाली, “मला निर्मात्यांनी सायनिंगची रक्कम देखील दिली होती. चित्रपटाबद्दल प्रेस कॉन्फर्संमध्ये बोलायला मी सुरू देखील केलं होतं. मात्र, ऐनवेळी मला कोणतीही कल्पना न देता राम गोपाल वर्मा यांनी माझ्या जागी उर्मिला मातोंडकरला घेतले. मी वर्तमान पत्रात वाचल्यानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असून माझ्या जागी उर्मिला असल्याचे मला समजले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मला किंवा माझ्या मॅनेजरला कॉल करून याची काही कल्पना देखील दिली नव्हती. ‘सत्या’ हा माझ्या करिअर मधला दुसरा चित्रपट असता.”

पुढे महिमाने तिच्या आणि अजय देवगणच्या अफेअरच्या चर्चांमुळे खाजगी आयुष्यावर कसा परिणाम झाला हे देखील सांगितलं. ती म्हणाली, “१९९९ मध्ये ‘दिल क्या करे’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना माझा अपघात झाला. या अपघातात माझ्या चेहऱ्यावर दुखापत झाली. अपघाता नंतर एका मॅगझीन मध्ये माझा फोटो होता. त्यानंतर मला स्कार फेस म्हणून सगळे बोलायला लागले. यामुळे मी मानसिकदृष्टा खचली होती. यावेळी मला सगळ्यात जास्त मदत ही अजय आणि काजोलने केली होती.” २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘डार्क चॉकलेट’ हा तिचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर ती बॉलिवूड पासून लांब गेली.