News Flash

धक्कादायक! २३ वर्षीय अभिनेत्रीचा ट्रेनमध्ये विनयभंग, सहप्रवाशांची बघ्याची भूमिका

मध्यरात्री १ च्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला

प्रवाशाला पोलिसांनी अटक केली आहे.

देशात महिला सुरक्षित नसल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २३ वर्षीय अभिनेत्री सनुषा संतोष हिचा मावेली एक्स्प्रेसमध्ये सहप्रवाशानं विनयभंग केला असून इतर सहप्रवाशांनी यात केवळ बघ्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप तिनं केला आहे. सनुषा ही मावेली एक्स्प्रेसमधून प्रवास करत होती, त्यावेळी रात्रीच्या सुमारास एका सहप्रवाशानं तिच्यासोबत गैरवर्तणूक केली. या प्रकरणी थिसूर पोलीस स्थानकात तक्रार केल्यानंतर या प्रवाशाला पोलिसांनी अटक केली आहे.

विनयभंग करणाऱ्याला दीपिकाने असा शिकवला धडा

या धक्कादायक प्रकाराबद्दल एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, ‘मी मावेली एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. रात्री १ च्या सुमारास विचित्र स्पर्शानं मला जाग आली. मी अपर बर्थवर झोपले होते. त्यावेळी एक प्रवासी माझ्याशेजारी उभा होता आणि तो माझ्या ओठांना स्पर्श करत होता. या प्रकारानं माझ्या अंगावर भीतीनं काटाही आला आणि या माणसाचा मला रागही आला. मी तातडीनं आरडाओरडा करून इतर सहप्रवाशांना माझ्या मदतीसाठी बोलावले पण, धक्कादायक बाब म्हणजे एकाही प्रवाशाला माझी मदत करावीशी वाटली नाही. माझ्या बाजूच्या आसनांवर झोपलेल्या प्रवाशांनी बघ्याची भूमिका घेणं पसंत केलं.’

नागराजच्या चित्रपटात ‘या’ भूमिकेत दिसणार अमिताभ बच्चन

तिच्या मदतीला ट्रेनमधला फक्त एकच प्रवासी धावून आला. ट्रेनमध्ये एका महिलेसोबत अतिप्रसंग होत असताना फक्त एकच प्रवाशी धावून येणं ही खरंच शरमेची बाब आहे अशी तीव्र नाराजी तिनं व्यक्त केली. टीसीच्या मदतीनं लोहमार्ग पोलिसांना या घटनेबद्दल तातडीनं कळवण्यात आलं. पण पुढील स्थानकात पोहोचल्यानंतर अर्ध्यातासांनी पोलीस तिथे आल्याचंही तिनं म्हटलं. सनुषाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंग करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. सनुषा ही दाक्षिणात्य सिनेमा आणि मालिकेत काम करते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2018 1:23 pm

Web Title: malayalam actor sanusha santosh molested on train
Next Stories
1 VIDEO : ‘मासिक पाळी एक व्यक्ती असती तर…’
2 VIDEO : अक्षय म्हणतोय, ‘पिरियड्स के दाग अच्छे है’
3 नागराजच्या ‘झुंड’साठी बिग बी सज्ज
Just Now!
X