News Flash

तुम्हाला नसलेलं सोयर सुतक आम्ही पाळलं, विजय चव्हाणांवरील कुंडलकरांच्या पोस्टला जितेंद्रचं सडेतोड उत्तर

'बरं कसंय ना कि हे आम्हाला लहानपणापासून शिकवलंय आमच्या घरच्यांनी ज्याला आम्ही संस्कार असं म्हणतो'

जितेंद्र जोशी, Jitendra Joshi

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनानंतर अनेकांनीच त्यांना श्रद्धांजली देत आपले लाडके विजूमामा गल्याचं म्हणज शोक व्यक केला. कलाविश्वाती बऱ्याच मंडळींनीही विजूमामांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं. अशा या दु:खाच्या प्रसंगी दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांची पोस्ट मात्र एका वादळाच्या रुपात येऊन ठाकली. विजय चव्हाण आजारी असताना कोणी त्यांची भेट घेण्यासाठी गेलं होतं का, असं म्हणत त्यांनी या कलाकार मंडळींना खोचक सवाल केला. वुजय चव्हण यांचा उल्लेख ‘मामा’ म्हणून करत त्यांच्याशी नातं जोडू पाहणारे त्यांच्या आजारपणात कुठे होते, असं विचारणाऱ्या सचिन कुंडलकर यांच्या या प्रश्नाच उत्तर आता कलाकारांनी त्यांच्याच शैलीीत देण्यास सुरुवात केली आहे.

अभिनेता जितेंद्र जोशीने कुंडलकर यांची पोस्ट शेअर करत, त्याला उत्तर देत लिहिलं आहे, “सचिन कुंडलकर, क़ाय कमाल लिहिता हो तुम्ही पण गंमत अशी की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असे म्हणतात परंतु ती संधी तुम्ही आम्हाला देउच्च शकत नाही कारण विजय चव्हाण यांना आम्ही ‘मामा’ म्हटलेलं तुम्हाला चालत नाही परंतु सुमित्रा भावेंना तुम्ही एकेरी नावाने हाक न मारता ‘मावशी’ म्हणता आणि महेश एलकुंचवारांचा उल्लेख महेश’दा’ असा करता . बरं कसंय ना कि हे आम्हाला लहानपणापासून शिकवलंय आमच्या घरच्यांनी ज्याला आम्ही संस्कार असं म्हणतो त्यानुसार आमच्या घरी कामाला येणाऱ्या बाईला सुद्धा मावशी आणि रिक्शा टॅक्सी वाल्या वयस्कर गृहस्थाला अत्यंत सहजतेने काका/मामा म्हणतो आणि हे कुणीतरी बळजबरी केली म्हणून नव्हे तर तसा भाव आमच्या मनात प्रकट होतो आपोआप. तुम्ही अभ्यासू आणि होऊ घेतलेले विचारवंत आहात म्हणून आणखी खोलात जाऊन् याचा विचार केल्यास असे लक्षात येते की ‘बाप राखुमादेवीवरु’ असं म्हणणाऱ्या ज्ञानोबारायांना आम्ही ‘माऊली’ म्हणतो. साधी मुक्ताबाई परंतु आमच्या तोडून् ‘मुक्ताई’ म्हणत त्या भावंडांच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तर अशी परंपरा आणि संस्कार लाभलेले आम्ही ‘भारतीय’ तुमच्या त्या फ्रांस आणि इटली मधे जाऊन सुद्धा तिथल्या एखाद्या गोऱ्याला uncle /aunty असेच संबोधतो कारण ते आम्हाला आपसुक येतं आणि आम्हाला त्याची लाज वाटत नाही.”

आपल्याला मिळालेले संस्कार, रंगभूमीवर नि:स्वार्थपणे काम करणारे विजूमामा यांच्याशी असलेलं नातं, त्यांचं अमूल्य योगदान या सर्व गोष्टींकडे जितेंद्रने लक्ष वेधलं. माझी मुलगी स्पृहा, सई, पर्ण यांना आपली मुलगी आतापासूनच आत्या/ मावशी म्हणून हाक मारते असं म्हणत ही बाब संस्कारांची आहे, हा मुद्दा जितेंद्रन निकषाने अधोरेखित केला. या पोस्टच्या शेवटी त्याने सचिन यांना आपण काल (शुक्रवारीच) उत्तर देणार असतो, असंही स्पष्ट केलं. मुख्य म्हणजे या पोस्टच्या शेवटी जितेंद्रचे शब्द तीक्ष्ण झाले असून, त्यातून कुंडलकरांवर थेट निशाणा साधला गेल्याचं कळत आहे.

वाचा : सचिन कुंडलकर, आरोप करायच्या आधी वस्तुस्थिती तर बघा; आदेश बांदेकरांचा सल्ला

दरम्यान, जितेंद्रपूर्वी अभिनेते आदेश बांदेकर यांनीही सचिन कुंडलकर यांच्या या पोस्टवर आपली प्रतिक्रिया दिली होती. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. विजय चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. “चव्हाण यांच्या आजाराची बातमी उद्धव ठाकरेंना समजली. तसंच त्यांना श्वसनाचा विकार असल्याचंही त्यांना कळलं. त्यानंतर त्यांनी मला आवश्यक ती मदत तातडीनं करण्यास सांगितलं. त्यांना मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मी त्यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसंच त्यांना श्वसनाचा आजार असल्यानं आवश्यक असलेलं अडीच लाख रुपयांचं ऑक्सिजन काँन्सस्ट्रेशन मशिनदेखील घेऊन दिलं”, असं ते लोकसत्ता ऑनलाईनला दिलेल्या माहितीत म्हणाले होते. तेव्हा आता या सर्व प्रकरणावर सचिन कुंडलकर काही उत्तर देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 11:15 am

Web Title: marathi actor jitendra joshi on director sachin kundalkar facebook post after vijay chavan death
Next Stories
1 ‘अगडबम’ची नाजुका पुन्हा परतणार
2 चित्र  रंजन : तरीही ‘हॅप्पी’ नाहीच!
3 खंदा कलाकार..
Just Now!
X