विविध विषयांना तितक्याच प्रभावीपणे हाताळणाऱ्या कलाविश्वात आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. सुबोध भावे, तृप्ती तोरडमल आणि राकेश बापट यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. कलाकारांचा दमदार अभिनय, थरकाप उडवणारं कथानक आणि त्याला मिळालेली पार्श्वसंगीताची जोड या साऱ्याची सुरेख झलक या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे.

स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती अभिनेता जॉन अब्राहमने केली आहे. ‘शरद’ आणि ‘कुसूम अभ्यंकर’ या जोडप्याच्या वैवाहिक आयुष्यात एकाएकी येणारं वादळ आणि एका भीतीचं सावट याभोवती चित्रपटाचं कथानक फिरत आहे. १९८० चा काळ या चित्रपटातून साकारण्यात आला असून तो एका सत्यघटनेवर आधारित असल्याचं कळत आहे.

वाचा : मध्यंतरातील संवाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटातील ‘सविता’ या महत्वपूर्ण पात्राच्या भूमिकेतून तृप्ती लोकांसमोर येणार आहे. तृप्ती तोरडमल हिचा हा पदार्पणाचा चित्रपट असल्यामुळे तिच्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. यापूर्वी, एका प्रसिध्द नाटकाद्वारे दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांनी हे पात्र लोकांसमोर सादर केले होते. त्यामुळे, चित्रपटाच्या पडद्यावर सविता साकारण्याचे मोठे आव्हान तृप्तीवर आहे. ३१ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.