News Flash

केरळात कमळ फुलणार, सुपरस्टार मोहनलाल यांचा लवकरच भाजपामध्ये प्रवेश?

मोहनलाल यांना शशी थरूर यांच्या विरोधात तिरुवनंतपूरच्या लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता.

मल्याळम सुपरस्टार अभिनेता मोहनलाल लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधान आले आहे. सोमवारी सुपरस्टार मोहनाल यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहनलाल दोघांनीही कालच्या भेटीची ट्विटरवरून माहिती दिली. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले असून मोहनलाल हे भाजपामध्ये जाण्याची शक्यता राजकीय सूत्रांकडून वर्तवली जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपाने तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत घवघवीत यश मिळावे यासाठी भाजपाकडून सर्वस्वी प्रयत्न सुरू आहेत. मोहनलाल यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यास केरळमध्ये नक्कीच कमळ फुलेल. राजकीय सुत्रांच्या अंदाजानुसार जर मोहनलाल यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यास त्यांना काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या विरोधात तिरुवनंतपूरच्या लोकसभा मतदारसंघातून तिकीट देवू शकते.

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजपा आधीपासूनच प्रयत्न करत आहे. याआधी क्रिकेटर श्रीसंतने भाजपाकडून निवडणूक लढवली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एका जागेवर विजय मिळण्यात यश आले होते. तसेच मतांच्या टक्केवारीत सुधारणा झाली होती. सुत्रांच्या वृत्तानुसार, भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष के. राजशेखर यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांचा वारसदार म्हणूनही मोहनलाल यांच्याकडे पाहिले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2018 4:30 pm

Web Title: mohanlals meeting with pm modi stokes 2019 kerala speculation
Next Stories
1 राजस्थान: वसुंधरा सरकारची राजकीय खेळी, गरीब महिलांना देणार मोबाइल
2 विमान प्रवास रिक्षापेक्षा १ रुपयाने स्वस्त – जयंत सिन्हा
3 राहुल गांधी २०१९च्या निवडणुकीनंतर पंतप्रधान होतील : अमरिंदर सिंग
Just Now!
X