News Flash

Photo : Mr. लेले…मराठमोळ्या भूमिकेत वरुण धवन

पुन्हा एकदा वरुण त्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे.

चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित

अभिनेता वरुण धवन व दिग्दर्शक शशांक खैतान तिसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात वरुण मराठमोळ्या भूमिकेत दिसणार आहे. ‘मिस्टर लेले’ असं या चित्रपटाचं नाव असून करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटाचा पहिलाच पोस्टर प्रदर्शित झाला असून वरुण पुन्हा एकदा त्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे.

या पोस्टरमध्ये वरुण हात वर करून घाबरलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे. अंडरवेअरवर असलेल्या वरुणच्या एका हातात रिव्हॉल्वर आणि कमरेला फॅनी पॅक बांधलेला आहे. शशांक खैतान आणि वरुणने याआधी ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’ आणि ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ या दोन चित्रपटांसाठी एकत्र काम केलं होतं. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आणि प्रेक्षकांचीही मनं जिंकली. त्यामुळे हा तिसरा चित्रपटसुद्धा मनोरंजनाने परिपूर्ण असा मसालापट असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आणखी वाचा : बॉक्स ऑफिसवरही ‘तान्हाजी’च हीरो

२०२१ या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वरुणसोबत अभिनेत्री कियारा अडवाणीची मुख्य भूमिका असण्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही. कियाराने नकार दिल्यास दुसरा पर्याय म्हणून जान्हवी कपूरला निवडलं जाईल असं म्हटलं जात आहे. जान्हवीन शशांकच्या ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

वरुणचे आगामी चित्रपट

सध्या वरुण त्याच्या आगामी ‘स्ट्रीट डान्सर 3D’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यामध्ये त्याच्यासोबत नोरा फतेही, श्रद्धा कपूर यांच्या भूमिका आहेत. याशिवाय त्याचा ‘कुली नंबर १’ हा चित्रपटसुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये वरुण व सारा अली खान मुख्य भूमिका साकारत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2020 1:17 pm

Web Title: mr lele first look varun dhawan shashank khaitan karan johar ssv 92
Next Stories
1 बॉक्स ऑफिसवरही ‘तान्हाजी’च हीरो
2 JNU प्रकरणी दीपिकाने पाठिंबा दिल्यामुळे जाहिरात कंपन्या बॅकफूटवर
3 ‘छपाक’नं सोडली उत्तराखंड सरकारवर छाप; मेघना गुलजार यांनी केलं निर्णयाचं स्वागत
Just Now!
X