News Flash

मृण्मयी आणि गौतमीची सुरेल मेजवानी, ही वाट दूर जाते…

गौतमीने 'मन फकिरा' या सिनेमासाठी पार्श्वगायन केलंय

मराठी कलाविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिकणाऱ्या दोन बहिणी म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. रंगमंच, मालिका आणि सिनेमांमधून मृण्मयीने आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनावर राज्य केलंय. ‘कुंकू’ या मालिकेतून मृण्मयी घराघरात पोहचली. त्यानंतर कट्यार काळजात घुसली, मोकळा श्वास, फत्तेशिकस्त, नटसम्राट अशा अनेक सिनेमांमधून तिनं वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

मृण्मयीच्या पावलांवर पाऊल ठेवत तिची बहिण गौतमीनेदेखील अभिनय क्षेत्राकडे मोर्चा वळवला. ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेतून तिने टेलिव्हिजनवर एण्ट्री केली. सध्या ‘माझा होशील ना’ या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.
मृण्मयी आणि गौतमी दोघी सोशल मीडियावर चांगल्याचं सक्रिय असतात. नुकताच मृण्मयीने गौतमीसोबतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. यात दोघी एक सुरेल गाण गात आहेत. ही वाट दूर जाते हे गाणं त्या एकत्रित गात आहेत. या दोघी बहिणींच्या गाण्याला चाहत्यांनी मोठी पसंती दिलीय.

मृण्मयी आणि गौतमी दोघी उत्तम गायिका आहेत. गौतमीने तर ‘मन फकिरा’ या सिनेमासाठी पार्श्वगायन केलंय. तर मृण्मयी देशपांडेनं या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून दिग्दर्शन क्षेत्रातील हे तिचं पदार्पण आहे. गौतमीही अनेकदा तिच्या गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तर माझा होशील ना या मालिकेतील तिची सईची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 7:46 pm

Web Title: mrunmayee and gautami deshpande shares video of singing kpw 89
Next Stories
1 घरच्या ‘जिम्नॅस्ट’मुळं हैराण आहे ट्विंकल खन्ना; म्हणते हिच्यापेक्षा त्रास देणारे शेजारी बरे!
2 ‘हिरोपंती २’चं पोस्टर कॉपी केलं? टायगर श्रॉफ झाला ट्रोल
3 धकधक गर्लची ओटीटी प्लॅटफॉर्मवर एण्ट्री, माधुरी घेणार ‘आनामिका’चा शोध
Just Now!
X