बॉलिवूडमध्ये सलमान, शाहरुख, आमिर खाननं राज्य केलंय, करत आहेत आणि भविष्यातही करतील खानचा जमाना हा न संपणारा आहे असा विश्वास अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं व्यक्त केला आहे.. या तिन्ही सुपरस्टारचे २०१८ मध्ये बिग बजेट चित्रपट आले. हे तिन्ही चित्रपट फ्लॉप गेले मात्र एक चित्रपट फ्लॉप गेल्यानं चाहत्यामध्ये असलेली ‘खान’दानची जादू कधी संपणार नाही ती जादू कायमस्वरूपी तशीच राहणार असा विश्वास नवाजचा आहे.

अभिनेता नवाजुद्दीन गेल्या दीड दोन वर्षात फॉर्ममध्ये आहे. ‘मंटो’, ‘ठाकरे’, ‘सेक्रेड गेम्स’च्या यशानं नवाजच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. या वर्षांत सेक्रेड गेम्ससह नवाजचे तीन चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘ठाकरे’नंतर तर नवाज बॉलिवूडवर राज्य करत आहे. तिन्ही खानचे चित्रपट फ्लॉप झालेत आता खानची जादू संपली असल्याचं वाटतं का असा प्रश्न एका मुलाखतीत नवाजला विचारला. त्यावेळी नवाजनं ‘नाही’ असं उत्तर दिलं.

बॉलिवूडमध्ये खानचा जमाना कायमच राहणार. एक चित्रपट फ्लॉप गेल्यानं खानचा जमानाच निघून गेला असं होत नाही. तो कायमच राहणार. एक चित्रपट फ्लॉप गेल्यानं कोणाचं करिअर संपत नसतं असं नवाज म्हणाला. गेल्यावर्षी सलमानचा ‘रेस ३’, आमिरचा ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ आणि शाहरूखचा ‘झिरो’ असे तीन चित्रपट आले. हे तिन्ही चित्रपट फ्लॉप गेले. तर राजकुमार राव, नवाजुद्दीन सिद्दीकी, आयुषमान खुराना यांच्या चित्रपटानं मात्र बक्कळ कमाई केली होती.