News Flash

“मला बऱ्याचदा आधीच त्या पुरुषांचे मनसुबे लक्षात यायचे”, नीना गुप्ता यांचा खुलासा

बेधडक वक्तव्यांमुळे नीना गुप्ता चर्चेत

अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या अभिनयासोबत बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. नीना गुप्ता अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आल्या आहेत. नीना गुप्ता यांनी आजवर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. पुन्हा एकदा नीना गुप्ता यांनी अशा एका गोष्टीचा खुलासा केलाय ज्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. अनेक पुरुषांनी आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न केला असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नीना गुप्ता यांनी या गोष्टीचा खुलासा केलाय. या मुलाखतीत नीना गुप्तांनी पती विवेक मेहरासोबतच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. अनेक काळ नीना गुप्ता या सिंगल होत्या. यावरून नीना गुप्ता यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्या एकट्या असताना पुरुषांनी त्यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला होता का? या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, “हो असं झालंय. मात्र मला बऱ्याचदा आधीच त्या पुरुषांचे मनसुबे लक्षात यायचे.  तसचं कुणीही महिलेच्या इच्छेशिवाय तिच्या जवळ येऊ शकत नाही.” असं त्या म्हणाल्या. यावेळी सिनेसृष्टीत मात्र असे अनुभव आले नसल्याचं नीना गुप्ता यांनी स्पष्ट केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

आणखी वाचा- ‘फ्रेण्डस्’ शोच्या सेटवरील अमानीचा संघर्ष माहितेय का?, लेखकाने केला होता छळ

लवकरच नीना गुप्ता ‘सच कहूं तो’ हे त्यांचं आत्मचरित्र्य लॉन्च करणार आहेत. नुकताच नीना गुप्ता यांनी त्यांच्या या पुस्तकाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. काही दिवसांपूर्वीच नीना गुप्ता यांनी एक व्हिडीओ शेअर करत पुस्तक लॉन्च करत असल्याची माहिती दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 12:37 pm

Web Title: neena gupta open ups as many mens approached her said i realize the intentions kpw 89
Next Stories
1 Video: …अन् गडकरी ‘बिग बीं’ना म्हणाले, “नाटक मत कर, रख नीचे फोन”
2 पाकिस्तानची चेष्टा केल्याने झाली नाराज; प्रियकरासोबत ठरलेलं लग्न अभिनेत्रीने मोडलं
3 ‘फ्रेण्डस्’ शोच्या सेटवरील अमानीचा संघर्ष माहितेय का?, लेखकाने केला होता छळ
Just Now!
X