23 September 2020

News Flash

‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेत लक्ष्मीसमोर येणार मल्हारचे वेगळे रूप

मल्हारचाच स्वभाव करणार त्याचा घात

'लक्ष्मी सदैव मंगलम्'

कलर्स मराठी वाहिनीवरील लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेला एक अनपेक्षित वळण आले आहे आणि त्यामुळेच लक्ष्मीच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडत आहेत. मध्यंतरी लक्ष्मीने अजिंक्यसोबत अबोला धरला होता. अजिंक्यने त्याच्या मनातील भावना लक्ष्मीला सांगितल्या आणि त्यामुळे लक्ष्मीने अजिंक्यशी बोलणे बंद केले होते. परंतु आता अजिंक्यने लक्ष्मीची समजूत काढली असून त्यांच्यामधील मैत्री कायम आहे आणि याचेच कुठेतरी दु:ख, किंवा राग मल्हारच्या मनात आहे. लक्ष्मीसमोर गेल्या काही दिवसांपासून खूप मोठे कोडे आहे आणि ते म्हणजे मल्हारचा बदलेला स्वभाव. मल्हारच्या अश्या विचित्र वागण्यामागचे कारण तिला कळत नाहीये आणि यामुळेच ती संभ्रमात आहे.

दिवाळी पाडव्याला मल्हारने एक वेगळीच अट लक्ष्मीला घातली होती. संध्याकाळी ७ वाजता लक्ष्मीने मल्हारला पहिल्यांदा ओवाळावे आणि आर्वीसाठी लक्ष्मीला मल्हारची ती अट मान्य करावी लागली होती. पण मल्हारच्या अशा विचित्र वागण्याने लक्ष्मी द्विधा मनस्थितीत आहे. हा गुंता लक्ष्मी कसा सोडवेल? लक्ष्मीसमोर मल्हारचे कोणते वेगळे रूप येईल? लक्ष्मी ही परिस्थती कशी हाताळेल? हे बघणे रंजक असणार आहे.

Photo : पहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू

लक्ष्मी आणि अजिंक्य यांच्यातील वाढत्या मैत्रीमुळे मल्हारला त्रास होत आहे. मल्हारच्या लक्ष्मीवरील वाढत्या प्रेमामुळे त्याला आता लक्ष्मी आणि अजिंक्यमधली मैत्री तोडायची आहे. दुसरीकडे अजिंक्यने लक्ष्मीची मैत्री आणि विश्वास पुन्हा मिळवला असून केवळ लक्ष्मीच्या आग्रहाखातर तो कुस्ती खेळण्यास तयार झाला आणि त्याने तो सामना जिंकलादेखील. आता लवकरच मल्हार लक्ष्मीला त्याला वाटणाऱ्या भावना आणि प्रेम तिच्याजवळ व्यक्त करणार असून लक्ष्मीला तिचा हक्कदेखील मिळवून देणार आहे. परंतु हे सगळं होत असताना मल्हारचा एक वेगळाच चेहरा लक्ष्मी समोर येणार आहे. मल्हारच स्वत:चा मोठा शत्रू बनून स्वत:समोर उभा राहणार आहे. या सगळ्यातून लक्ष्मी मल्हारला कशी वाचवेल? अजिंक्य आणि तिची मैत्री लक्ष्मी कशी टिकवून ठेवेल? मल्हार पुढे काय करेल ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2018 3:55 pm

Web Title: new twist in colors marathi serial laxmi sadaiv mangalam
Next Stories
1 लग्नाच्या वाढदिवशी सोनालीने गोल्डीसाठी लिहिली भावनिक पोस्ट
2 आहेर नको दान करा, दीप-वीरची पाहुण्यांना विनंती
3 पहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू
Just Now!
X