05 December 2020

News Flash

किसिंग सीनमुळे बिपाशा बासू पडायची आजारी; सांगितला चकित करणारा अनुभव

किसींग सीन करताना येतात कुठल्या समस्या?; बिपाशाने केला खुलासा

बॉलिवूडची हॉरर क्वीन बिपाशा बासू आपल्या मादक अदांसाठी प्रसिद्ध आहे. आजवर अनेक चित्रपटांमध्ये तिने इंटिमेट सीन्स केले आहेत. मात्र अशी दृश्य चित्रीत करताना तिला आजारी पडायला होतं, असा आश्चर्यचकित करणारा खुलासा बिपाशाने केला आहे. “किसिंग सीन्स शूट करणं अत्यंत कठीण काम असतं. या दृश्यांमुळे अस्वस्थ व्हायला होतं. तसंच मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. असं बिपाशा म्हणाली.

बिपाशा बासू ‘डेंजरस’ या वेब सीरिजच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. या सीरिजच्या निमित्ताने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत बिपाशाने चित्रपटांमधील चुंबन दृश्यांवर भाष्य केलं. ती म्हणाली, “नवरा सहकलाकार असेल तर इंटिमेट सीन्स करताना मानसिक तणाव जाणवत नाही. पण अनोळखी कलाकारासोबत अशी दृश्य चित्रीत करणं सोप नसत. आपण कितीही प्रोफेशनल आप्रोच ठेवला तरी कॅमेरासमोर किस करताना दडपण येतंच. यापूर्वी अशी दृश्य चित्रीत होऊ नये यासाठी मी प्रयत्न करायचे. मला भीती वाटते, मला चक्कर येतेय. मला बरं वाटत नाहीये अशी कारण मी अनेकदा दिली आहेत.” असा अनुभव बिपाशाने सांगितला.

‘डेंजरस’ ही क्राईम मिस्ट्री प्रकारातील वेब सीरिज आहे. ही सीरिज नुकतीच एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाली. या सीरिजमध्ये बिपाशासोबत तिचा पती करण सिंग ग्रोव्हर व नताशा सुरी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या सीरिजच्या माध्यमातून बिपाशाने रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं आहे. या सीरिजमध्ये देखील तिने अनेक इंटिमेट सीन्स केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2020 7:49 pm

Web Title: on screen kissing is scary says bipasha basu mppg 94
Next Stories
1 सुपरस्टार विजयच्या चाहत्याने केली आत्महत्या; मृत्यूपूर्वी केलं होतं हे ट्विट
2 दिशा सालियन मृत्यू प्रकरण: अभिनेत्याच्या अडचणींत वाढ; दिशाच्या वडिलांनी केली पोलीस तक्रार
3 पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती खालावली
Just Now!
X