कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये हॉलीवूडचा सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा  ‘८८ वा ऑस्कर पुरस्कार’ वितरण सोहळा आज पार पडला.  यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘द रिव्हनंट’, ‘स्पॉटलाईट’ आणि ‘मॅड मॅक्स फ्युरी रोड’ या चित्रपटांनी बाजी मारली. ‘स्पॉटलाईट’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकाविला. तर याच चित्रपटासाठी जॉश सिंगर आणि टॉम मॅकार्थी यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचा सन्मान मिळाला. सहावेळा ऑस्करने हुलकावणी दिल्यानंतर अखेर लिओनार्डो दि कॅप्रिओ’ला ‘द रिव्हनंट’ मधील मुख्य भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले. तर अभिनेत्री ब्री लार्सनला ‘रुम’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
विशेष म्हणजे, बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ ते हॉलीवूडची ‘क्वांटीको गर्ल’ असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. प्रियांकाच्या हस्ते सर्वोत्कृष्ट संकलनाच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

ऑस्कर पुरस्काराचे मानकरी-

सर्वोत्कृष्ट चित्रपट- स्पॉटलाइट

सर्वोत्कृष्ट अभिनेता- लिओनार्डो दीकॅप्रिओ (द रिव्हनंट)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- ब्री लार्सन (रुम)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अलेजांड्रो (द रिव्हनंट)

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म- बिअर स्टोरी

सर्वोत्कृष्ट ओरिजन साँग (मूळ गीत) – रायटिंग्ज ऑन दि वॉल

सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर (मूळ संगीत) – एनीयो मॉरिकोनी (द हेटफुल एट)

परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट – सन ऑफ सोल

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – मार्क रायलन्स ( ब्रिज ऑफ स्पाईस)

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर फिल्म- इनसाईड आऊट

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म- बिअर स्टोरी

सर्वोत्कृष्ट संकलन- मार्गारेट सिक्सेल (मॅड मॅक्स, फ्युरी रोड)

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्टस – अँड्रयू व्हाईटहर्स्ट (एक्स मकिना)

सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन – मार्क मँगिनी आणि डेव्हिड व्हाईट (मॅड मॅक्स , फ्युरी रोड)

सर्वोत्कृष्ट छायाचित्रण: एमॅन्युअल ल्युबेझ्कीला (द रिव्हनंट)

सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाईल : लेस्ली वेंडरवॉल्ट (मॅड मॅक्स फ्युरी रोड)

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन : कॉलिन गिब्सन, लिसा थॉम्प्सन (मॅड मॅक्स फ्युरी रोड)

सर्वोत्कृष्ट वेशभूषा : जेनी बिवन (मॅड मॅक्स फ्युरी रोड).

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : अलिसिया विकॅन्डर (द डॅनिश गर्ल)

सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा : द बिग शॉर्ट (चार्ल्स रॅन्डॉल्फ आणि अॅडम मॅके)

सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा : स्पॉटलाईट (जॉश सिंगर आणि टॉम मॅकार्थी)