News Flash

गैरवर्तनामुळे पराग कान्हेरे बिग बॉसच्या घराबाहेर?

बिग बॉस परागला घराबाहेर काढणार का? असा प्रश्न चाहत्यांनसमोर उभा आहे

वादग्रस्त पण तितकाच चाहत्यांच्या पसंतीला उतरलेला शो म्हणजे बिग बॉस मराठी. बिग बॉस मराठीचे २ पर्व सुरु होऊन आता बरेच आठवडे उलटले आहेत. घरात सतत काही ना काही घडामोडी घडतच असतात. अभिजीत बिचुकलेच्या अटकेनंतर आता पुन्हा एकदा बिग बॉसच्या चाहत्यांना आणखी एक धक्का बसणार असल्याचे म्हटले जात आहे. एका टास्क दरम्यान पराग कान्हेरेने नेहासोबत गैरवर्तन केले. त्यामुळे बिग बॉस परागला घराबाहेर काढणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

बिग बॉसच्या स्पर्धकांना बिग बॉसने ‘टिकेल तो टिकेल’ हा टास्क दिला होता. टास्क दरम्याम पराग आणि नेहामध्ये वाद होतात. पराग त्याच्या रागावरील ताबा गमावतो आणि नेहाच्या कानाखाली लगवातो. परागचे हे वागणे पाहून चाहत्यांना धक्काच बसतो. यापूर्वी बिग बॉस स्पर्धक शिवानी दांडेकरला तिच्या तब्येतीच्या कारणांमुळे घराबाहेर काढण्यात आले होते. त्यापाठोपाठ अभिजीत बिचुकलेंना अटकेमुळे घराबाहेर पडावे लागले आणि आता परागच्या गैरवर्तनामुळे बिग बॉस त्याला घराबाहेर काढणार का असा प्रश्न चाहत्यांनसमोर उभा आहे.

बिग बॉसच्या २ पर्वाच्या सुरुवातीपासूनच पराग घरामध्ये सतत चर्चेत राहिला आहे.  उत्तमरित्या टास्क खेळण्याची पद्धत, त्या सोबतच माईंडने गेम खेळण्यामुळे तो घरातील स्ट्राँग स्पर्धकमधून ओळखला जातो. परागने त्याच्या भाच्याला किडनी दान केली असून त्याने ही घटना किशोरी शहाणे यांना सांगितली आहे. वूटच्या अनसीन अनदेखाच्या नव्या क्लिपमध्ये पराग किशोरींना हे सांगताना दिसून येत आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 11:34 am

Web Title: parag kanhere is going out from house because of his misbehave with neha avb 95
Next Stories
1 ‘चमच्याच्या नशिबात खरकटं राहणंच’, नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी जगताप यांचा सल्ला
2 बिग बींनी शेअर केला मुलीसोबतचा हा खास फोटो
3 सोनाक्षीच्या ‘खानदानी शफाखाना’च्या तारखेत बदल, या दिवशी होणार प्रदर्शित
Just Now!
X