करोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. जगभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. करोनामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. अशा या प्रतिकूल परिस्थितीवर अभिनेते परेश रावल यांनी एका चारोळीच्या माध्यमातून भाष्य केले आहे. त्यांचा हा काव्यात्मक अंदाज सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

रहिमन वेकसीन ढूँढीयो, बिन वेकसीन सब सून।
वेकसीन बिना ही बीत गये, अप्रैल मई और जून।

BJP may bench prominent leaders
भाजपा पूनम महाजन यांचं तिकीट कापणार? बृजभूषण सिंह, जामयांग नामग्यालही रांगेत.. नेमकं घडतंय काय?
Uddhav Thackeray On BJP and Shinde group
उद्धव ठाकरेंची भाजपा आणि शिंदे गटावर टीका; म्हणाले, “थापाड्यांची खोटारड्यांची लंका…”
sushma andhare
“दोन वाघांची लढाई, पण कुत्र्यांचा फायदा…”, सुषमा अंधारेंची भाजपावर बोचरी टीका
Randeep Hudda Post
सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याची हत्या, रणदीप हुडाने मानले अज्ञात मारेकऱ्यांचे आभार, पोस्ट शेअर करत म्हणाला..

अशी संत कबिर यांच्या अंदाजात लिहिलेली चारोळी परेश रावल यांनी ट्विट केली आहे. लसी शिवाय तीन महिने गेले. मात्र अद्याप करोनावर मात करणारी लस सापडलेली नाही. लवकरात लवकर लस शोधून काढा. अन्यथा आपलं काही खरं नाही. असा या चारोळीचा अर्थ आहे. परेश रावल यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती आहे करोनाग्रस्तांची संख्या?

मागील २४ तासांमध्ये महाराष्ट्रात ७ हजार १८८ करोना रुग्ण बरे होऊन गेले आहेत.त्यामुळे आत्तापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ८२ हजार २१७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या म्हणजेच रिकव्हरी रेट ५५.७२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान आज राज्यात ८ हजार ३६९ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात २४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातला मृत्यू दर ३.७५ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

प्रमुख शहरं आणि अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या

मुंबई – २३ हजार ७०४
ठाणे- ३६ हजार २१९
रागड ५ हजार ३५७
पुणे- ३६ हजार ८१०
कोल्हापूर- १ हजार ४०१
नाशिक- ४ हजार २२१
औरंगाबाद- ४ हजार ३७०
नागपूर १ हजार १४५