26 February 2021

News Flash

PHOTO : निवेदिता सराफ झाल्या ‘नॉस्टॅल्जिक’

निवेदिता यांनी नुकताच कोल्हापूर दौरा केला.

निवेदिता सराफ

‘दुहेरी’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेच्या टीमने नुकताच कोल्हापूर दौरा केला. त्यात निवेदिता सराफ यांच्यासह सुपर्णा श्याम आणि संकेत पाठक यांचाही समावेश होता. निवेदिता सराफ आणि कोल्हापूर यांचं जवळचं नातं आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या ‘धुमधडाका’ या चित्रपटापासून अनेक चित्रपटांचं त्यांनी कोल्हापूरमध्ये चित्रीकरण केलं होतं. त्या सगळ्या आठवणी या भेटीच्या निमित्तानं ताज्या झाल्या. कोल्हापूरमध्ये राहताना लावलेली लायब्ररी, तिथली भटकंती, महालक्ष्मी मंदिरातल्या मन शांत करणाऱ्या अनुभवापर्यंतच्या अनेक आठवणी होत्या. या कोल्हापूर दौऱ्यात ‘दुहेरी’ टीमनं नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मीचंही दर्शन घेतलं. महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदिराजवळ खरेदीही केली.

वाचा : एमएमएस ते मुलाचं नाव, ‘या’ कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती करिना

कोल्हापूरच्या या ‘नॉस्टॅल्जिक’ अनुभवाबद्दल निवेदिता सराफ म्हणाल्या, ‘आजवरचा माझा प्रवास कोल्हापूरपासूनच सुरू झाला. त्यामुळे कोल्हापूरचं माझ्या मनातलं स्थान खूपच खास आहे. चित्रीकरणाच्या निमित्ताने सहा सहा महिने मी कोल्हापूरला येऊन रहायचे. तिथलं जेवणं, माणसं, माती सारंच अद्भूत आहे. तांबडा-पांढरा रश्श्याची चव तर वर्णनापलीकडे आहे. कोल्हापूरनं मला खूप काही दिलं आहे.’

वाचा : ‘इलियानासोबत नाचायला मी काही वरुण धवन नाही’

सुहासिनी सूर्यवंशी (निवेदिता सराफ), दृश्यांत सूर्यवंशी (संकेत पथक) आणि सोनिया कारखानीस (सुपर्णा श्याम) या तीन व्यक्तिरेखांतील नातं पुढे कसं उलगडतं हे ‘दुहेरी’ या कौटुंबिक थरार मालिकेत तुम्हाला पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 10:46 am

Web Title: photo duheri serial actor nivedita saraf become nostalgic while visited in kolhapur
Next Stories
1 दीपिकाला ही रिंग तू दिलीस का?, चाहत्यांचा रणवीरला सवाल
2 ‘इलियानासोबत नाचायला मी काही वरुण धवन नाही’
3 Padmavati first look: राणी पद्मावती पधार रही हैं..
Just Now!
X