News Flash

दीपिकाच्या वडिलांसोबत रणवीरचा ‘परफेक्ट सेल्फी’

'पदुकोण-द्रविड सेंटर फॉर स्पोर्ट एक्सलेंन्स'चे उदघाटन

प्रकाश पदुकोण, रणवीर सिंग

बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोड्यांमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या जोडीचे नाव न चुकता घेतले जाते. या तथाकथित प्रियकरांचे फोटो नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचा बिंदू ठरतात. मात्र, यावेळी रणवीरने दीपिकासोबत नाही तर तिचे वडील प्रकाश पदुकोण यांच्यासोबत शेअर केलेला सेल्फी सध्या सर्वांचे लक्ष वेधतोय.

वाचा : ‘एशियन गेम’ विजेत्या बॉक्सरला औषधांसाठी शाहरुखची ५ लाखांची मदत

नुकतेच प्रकाश पदुकोण आणि राहुल द्रविड यांनी बंगळुरु येथे ‘पदुकोण-द्रविड सेंटर फॉर स्पोर्ट एक्सलेंन्स’चे उदघाटन केले. भारतातील विविध खेळाडूंनी यावेळी उदघाटन समारंभाला हजेरी लावली होती. दीपिकाचा ‘पद्मावती’ चित्रपटातील सहकलाकार रणवीरही समारंभाला हजर राहिला होता. नेहमी चाहत्यांना सेल्फी देणाऱ्या रणवीरने यावेळी मात्र त्याची ‘फॅन मुमेण्ट’ अनुभवली. भारतातील प्रतिष्ठित खेळाडूंसोबत काढलेले सेल्फी त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, त्याने प्रकाश पदुकोण यांच्यासोबत काढलेला ‘परफेक्ट सेल्फी’ सर्वाधिक चर्चेत आहे. पण या सेल्फीमध्ये दीपिकाची कमतरता नक्कीच जाणवते.

प्रकाश यांनी काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिका-रणवीरच्या नात्यावर भाष्य केले होते. ‘ते दोघंही समंजस असून ते काय करत आहेत याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. एक वडील म्हणून मी दीपिकाला तिचे स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. इतेकच नव्हे तर याबाबतीतही ती तिच्या मनाप्रमाणे वागण्यास मोकळी आहे’, असे ते म्हणाले होते.

वाचा : .. म्हणून विरुष्काने गुपचूप लग्न केले; सानिया मिर्झाचा खुलासा

उच्च तंत्रज्ञान असणाऱ्या क्रीडा विद्याशाखांचे महत्त्व यावेळी राहुल द्रविड, अभिनव बिंद्रा, विश्वनाथन आनंद आणि गीत सेठी या महान खेळाडूंनी सांगितले. आपल्या वडिलांनी सुरु केलेल्या या नव्या उपक्रमासाठी दीपिकासुद्धा उपस्थित होती. कार्यक्रमात तिने वडिलांसोबतचा एक भावनिक किस्साही सर्वांना सांगितला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 2:03 pm

Web Title: photo ranveer singh shares a perfect click with deepika padukones father prakash padukone
Next Stories
1 ‘एशियन गेम’ विजेत्या बॉक्सरला औषधांसाठी शाहरुखची ५ लाखांची मदत
2 .. म्हणून विरुष्काने गुपचूप लग्न केले; सानिया मिर्झाचा खुलासा
3 VIDEO : शाहरुखच्या गाण्यावर अब्राम डान्स करतो तेव्हा..
Just Now!
X