News Flash

पोपटलालचं होणार लग्न? होणाऱ्या वधूच्या स्वागतासाठी ‘गोकुळधाम’वासी सज्ज

अखेर पोपटलालचं होणार लग्न..

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका विनोदी लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका गेल्या १२ वर्षांपासून आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यातील पोपटलाल हे पात्र खूपच रंजक आहे. लग्नाचं वय उलटूनही अद्याप बोहल्यावर न चढल्याने पोपटलाल कावराबावरा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. एवढ्या वर्षांमध्ये पोपटलालचं बऱ्याचदा लग्न ठरलं होतं. पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्यांच लग्न झालं नाही. अखेर आता एका मुलीने पोपटलालला लग्नासाठी होकार दिला आहे. त्यामुळे गोकुळधाम सोसायटी मध्ये राहणाऱ्या पोपटलालच्या मित्र परिवारात लग्नाची धामधूम सुरू झाली असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

हा व्हिडीओ ‘तारक मेहता का उलटा चष्मा’च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत पूजा नावाची एक मुलगी गोकुळधाम सोसायटीमध्ये आल्याचं दिसत आहे. ही मुलगी पोपटलालसोबत असल्याने सगळे गोकुळधामवासी हे त्याच्यासाठी आनंदीत आहेत.

मागील भागात आपण पाहिलं की, पोपटलाल एका मुलीला भेटला होता. त्या मुलीचे नाव पूजा होते. पूजा ही फक्त पोपटलालला भेटण्यासाठी म्हणून मुंबईला आल्याने पोपटलाल आनंदीत झाला आहे. त्याने पुन्हा एकदा लग्नाची स्वप्न पाहण्यास सुरूवात केली आहे.

गोकुळधामचे सगळे सदस्य पोपटलालच्या लग्नाच्या तयारीला लागले आहेत. पोपटलालच लग्न ठरलेलं असलं तरी या वेळी तरी पोपटलालचं लग्न होईल अशी आशा फक्त गोकुळधाम सोसायटीला नाही तर चाहत्यांना सुद्धा आहे.

दरम्यान, ‘तारक मेहता का उलटा चष्मा’च्या सेटवर अनेकांना करोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. तर भिडे मास्तर, गोली आणि आणखी दोन कलाकारांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 10:18 am

Web Title: popatlal from taarak mehta ka oolta chashma is finally getting married dcp 98
Next Stories
1 मालिकांचे चित्रीकरण परगावी
2  गंगूबाई.. तेलुगूतही!
3 ‘तान्हाजी’ मराठीत
Just Now!
X