21 October 2020

News Flash

प्रभूदेवा करणार संजय दत्त निर्मित चित्रपटाचे दिग्दर्शन!

१९९३ बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी अभिनेता संजय दत्त येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्यामुळे त्याच्या निर्मितीसंस्थेचे काम पूर्णपणे पत्नी मान्यता सांभाळत आहे.

| July 13, 2013 07:50 am

१९९३ बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी अभिनेता संजय दत्त  येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्यामुळे त्याच्या निर्मितीसंस्थेचे काम पूर्णपणे पत्नी मान्यता सांभाळत आहे. संजयचा नुकताच प्रदर्शित झालेला पोलिसगिरी चित्रपट प्रेक्षकांवर खास जादू चालवू शकला नसताना त्याच्या निर्मितीसंस्थेने अमिताभसोबत चित्रपटाच्या कामास सुरुवात केली आहे. तसेच, आणखी एका आगामी चित्रपटासाठी मान्यताने प्रभूदेवासमोर चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठीचा प्रस्ताव ठेवला आहे. तरी याबाबती सविस्तर माहिती कळू शकलेली नाही. प्रभूदेवाने याआधी वॉन्टेड, रावडी राठोड अशा रोमांचक चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून या संजय दत्त निर्मिती संस्थेच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी तयार झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2013 7:50 am

Web Title: prabhu deva to work with sanjay dutt productions
Next Stories
1 अभिषेक आणि ऐश्वर्या करणार हिमेश रेशमियाच्या चित्रपटात भूमिका?
2 प्राण यांना ‘जंजीर’चा रिमेक पाहण्याची होती उत्सुकता
3 पाहा – मद्रास कॅफे चित्रपटाचा पहिला ट्रेलर
Just Now!
X