25 November 2020

News Flash

भाचीशी नव्हे, तर प्रभूदेवाने केलंय ‘या’ फिजिओथेरपिस्टसोबत लग्न?

प्रभूदेवाने बांधली लग्नगाठ

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या नावांपैकी एक नाव म्हणजे प्रभूदेवा. आपल्या तालावर अनेकांना नाचायला लावणाऱ्या या नृत्यदिग्दर्शकाची लोकप्रियता काही कमी नाही. उत्तम नृत्यदिग्दर्शक, दिग्दर्शन आणि अभिनेता अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्यातील चुणूक दाखवणारा प्रभूदेवा कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून प्रभूदेवाच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्याची पर्सनल लाइफदेखील चांगलीच चर्चेत आली आहे. प्रभूदेवाने सप्टेंबर महिन्यात लग्न केल्याचं  ‘झी न्युज इंडिया ‘च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

मध्यंतरी प्रभूदेवा त्याच्या भाचीसोबत लग्न करणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, या सगळ्या अफवा असून प्रभूदेवा मुंबईतील एका फिजीओथेरपिस्टसोबत लग्न केलं आहे. विशेष म्हणजे सध्या ही जोडी चेन्नईमध्ये राहत असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prrabhudeva (@prabhudevaofficial)

पाठीला दुखापत झाल्यामुळे प्रभूदेवा या फिजीओथेरपीस्टकडे उपचार घेत होता. त्याच काळात या दोघांचं सूत जुळलं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मध्यंतरी प्रभूदेवा आणि त्याच्या भाचीच्या रिलेशनच्या चर्चा रंगल्या होत्या.मात्र, त्या सगळ्या अफवा असल्याचंदेखील सांगण्यात येत आहे.

दरम्यान, यापूर्वी प्रभूदेवाने १९९५ मध्ये रामलतासोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र, नयनतारामुळे या दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २०११ मध्ये प्रभूदेवा आणि रामलता यांनी कायदेशीरित्या घटस्फोट घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 12:17 pm

Web Title: prabhudheva got married to a physiotherapist in mumbai in september ssj 93
Next Stories
1 मिर्झापूरमधील गुड्डू पंडित करायचा कॉल सेंटरमध्ये काम; मिळत होता इतका पगार
2 लडकी ब्युटीफुल, कर गयी चुल्ल…; बादशाहच्या गाण्यावर पोलिसांनी केला धम्माल डान्स
3 …म्हणून नेहासोबत फ्लर्ट करायचो; आदित्य नारायणने केला खुलासा
Just Now!
X