02 March 2021

News Flash

ऐश्वर्यावरुन भांडले अभिषेक आणि प्रिती

प्रिती झिंटा आणि अभिषेक बच्चन यांच्यात ट्विटरवर हा वाद झाला

करण जोहर दिग्दर्शित ‘ए दिल है मुश्किल’चा टीजर रिलीज झाला आणि सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु झाली. रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय यांच्यातील केमिस्ट्रीबद्दलही अनेक चर्चा झाल्या. सिनेमात दाखवण्यात आलेल्या एश्वर्या आणि रणबीरच्या जवळकीमुळे बच्चन कुटुंब नाराझ असल्याची चर्चा मध्यंतरी फार गाजली. पण, अभिषेक बच्चनने ट्विटरवर या टिझरची प्रशंसा केल्यानंतर त्या फक्त अफवाच होत्या हेही सगळ्यांना कळले.
अजय देवगण, करण जोहरमध्येही एकमेकांच्या सिनेमांना कमी लेखण्यावुन वाद सुरुच आहेत. आता यात अजून एकाची भर पडली आहे ती म्हणजे प्रिती झिंटा आणि अभिषेक बच्चन…
प्रिती झिंटाने खास अभिषेकला ट्विट केले त्यात ती गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देताना म्हणाली की, मी आता ए दिल है मुश्किलचा टिझर बघतेय. मला वाटतंय की मी ऐश्वर्याच्या प्रेमात पडले आहे.’ तिच्या या गमतीशीर ट्विटला अभिषेकनेही तेवढेच मजेशीर उत्तर दिलं. तो म्हणला, ‘प्रिती दूर रहा. ती आधीच माझी झाली आहे.’ त्यांचं हे भांडणंही गमतीमध्येच झालं.

‘रोमॅन्टिक ड्रामा’ प्रकारात येणाऱ्या या सिनेमामध्ये अभिनेता रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, फवाद खान, अनुष्का शर्मा अशी तगडी स्टारकास्ट पाहता येणार आहे. प्रदर्शित झालेल्या टिझरमध्ये अभिनेता रणबीर कपूर गाणे गाताना दिसत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय बच्चन आणि फवाद खान यांची झलकही टिझरमध्ये पाहायला मिळत आहे. एकतर्फी प्रेम, घनिष्ठ मैत्री आणि त्यातून होणारा हिरमोड असे हटके कथानक हाताळत हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता रणबीर कपूर आणि फवाद खान नव्या लूकमध्ये दिसणार आहेत. सध्या या दोन्ही अभिनेत्यांची त्यांच्या लूकसाठी चर्चा सुरु आहे. या सिनेमाच्या निमित्ताने एका वेगळ्याच भूमिकेत दिसणारी ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांच्यातील केमिस्ट्री रसिकांना पाहायला मिळणार आहे. यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये रसिकांसाठी करण जोहर त्याच्या तगड्या स्टारकास्टसह ‘ए दिल है मुश्किल’ हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आणणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2016 9:04 pm

Web Title: preity zina and abhishek bachchan fights over aishwarya rai bachchan on twitter
Next Stories
1 अनिल आणि अर्जुन कपूरच्या ‘मुबारका’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख नक्की
2 असा आहे ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’मधल्या वरुण धवनचा लूक
3 VIDEO: बहुप्रतिक्षित ‘ए दिल है मुश्किल’ हे गाणे प्रदर्शित..
Just Now!
X