News Flash

प्रिया-अभयचे ‘तू, मी आणि गच्ची..’ गाणे

‘गच्ची’शी कधीच संबंध न आलेल्यांनादेखील ‘गच्ची’चा हेवा वाटू लागेल, असे हे गाणे आहे.

अभय महाजन, प्रिया बापट

तरुणाईसाठी ‘गच्ची’ म्हणजे त्यांच्या बालपणीच्या आठवणी जपणारी जागा. आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हवा असलेला निवांतपणा ही ‘गच्ची’ देते. याच गच्चीवर आधारित लँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांची निर्मिती असलेला ‘गच्ची’ चित्रपट येत्या २२ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गच्ची’वर आत्महत्या करायला चाललेल्या व्यक्तीला, ‘गच्ची’वरच आयुष्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन देणारा हा चित्रपट आहे. अभय महाजन आणि प्रिया बापट यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे नुकतेच प्रमोशनल साँग लाँच करण्यात आले.

वाचा : अनुष्का शर्माने शेअर केला हनिमूनचा पहिला फोटो

प्रिया आणि अभयने गायलेले प्रमोशनल साँग गच्चीबद्दल आपुलकी निर्माण करणारे आणि गच्चीवरच्या आठवणी ताज्या करणारे ठरत आहे. विशेष म्हणजे, अभयची गाण्याची ही पहिलीच वेळ असली तरी, प्रियासोबत गाताना त्यानेदेखील गाण्याची भरपूर मजा लुटल्याचे व्हिडिओत दिसून येते. तरुणाईला नकळत ताल धरायला लावणाऱ्या या प्रमोशनल साँगची खास स्टेपसुध्दा अभय आणि प्रियाने व्हिडिओमार्फत लोकांपर्यंत पोहोचवली आहे. ‘अनोळखी तू, मी आणि गच्ची’ या हटके गाण्याचे बोल ओमकार कुलकर्णी यांनी लिहिले आहेत, तर अविनाश विश्वजीत यांनी ते संगीतबद्ध केले आहे.

वाचा : महेश काळे आणि तौफीक कुरेशी यांची जुगलबंदी!

‘गच्ची’प्रेमींसाठी हे गाणं त्यांच्या हृदयाला भिडणार असेल, परंतू ‘गच्ची’शी कधीच संबंध न आलेल्यांनादेखील ‘गच्ची’चा हेवा वाटू लागेल, असे हे गाणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 4:04 pm

Web Title: priya bapat abhay mahajan gachchi song
Next Stories
1 अनुष्का शर्माने शेअर केला हनिमूनचा पहिला फोटो
2 महेश काळे आणि तौफीक कुरेशी यांची जुगलबंदी!
3 अर्शीनंतर हिना खानने तोडले सामान्य ज्ञानचे तारे
Just Now!
X