News Flash

लोकाग्रहाखातर मी दोनशेवेळा डोळा मारला-प्रिया

२०१७ मधला तो सर्वाधिक व्हायरल झालेला व्हिडिओ होता.

प्रिया वारियर

प्रिया प्रकाश वरियर ही सोशल मीडियावर रातोरात प्रसिद्ध झाली. आपल्या नजरेतून छायाळ करणाऱ्या या मल्याळम अभिनेत्रीनं वर्षभरापूर्वी तरुणाईला अक्षरश: वेड लावलं होतं. ‘ओरू अदार लव’ या चित्रपटातील गाण्यात तिनं ज्या नखरेल अंदाजात डोळा मारला होता त्यानं कित्येकांना घाळाय केलं होतं. २०१७ मधला तो सर्वाधिक व्हायरल झालेला व्हिडिओ होता. या व्हायरल व्हिडिओनं तिला तूफान प्रसिद्धी मिळवून दिली होती.

‘मात्र आज जिथे जाईल तिथे लोक आपल्याला डोळा मारून दाखवायला सांगतात’ असं म्हणत प्रियानं आपली नाराजी बोलून दाखवली आहे. ‘लोकाग्रहाखातर मी गेल्या वर्षभरात किमान २०० वेळा तरी डोळा मारून दाखवला असेल लोकांना त्यात काय आवडलं असा प्रश्न मला कधीतरी पडतो. मला आता या सगळ्या गोष्टीचा खूपच कंटाळा आलायं’ असंही प्रिया म्हणाली.

प्रियाचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर २०१७ मधली गुगलवरची सर्वाधिक सर्च केली गेलेली ती भारतीय व्यक्ती ठरली होती. प्रिया लवकरच ‘श्रीदेवी बंगलो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात सापडला आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूशी साधर्म्य दाखवणारं दृश्य या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं त्यामुळे श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला नोटीस पाठवली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2019 6:05 pm

Web Title: priya prakash varrier i get bored when people ask me to wink
Next Stories
1 Video : समाजातील विषमतेची ‘दुरी’ गली बॉयच्या गाण्यात
2 ..म्हणून भूमी पेडणेकरने दिशा पटानीला म्हटलं ‘कच्चा लिंबू’
3 पदार्पणापूर्वीच सारा, इशान, अनन्या आणि ताराकडे दुसऱ्या चित्रपटांची ऑफर्स
Just Now!
X